नेरुळ येथील रामलीला मैदानावर तेरणा संस्थेचा दावा

महापालिकेने मैदानावर खर्च केलेेले करोडो रुपये संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी

नवी मुंबई  : नेरुळ, सेक्टर-१२ येथील प्रसिध्द श्री गणेश रामलीला मैदानात दरवर्षी विविध स्पर्धा, महोत्सव होत असतात. नागरिक आणि सामाजिक संस्था सुध्दा महापालिकेची रितसर परवानगी घेऊन या मैदानाचा आजपर्यंत वापर करीत आलेले आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत रामलीला मैदानात नोटीस बोर्ड लावण्यात आले असून त्यात सदर मैदान तेरणा संस्थेचे असून रामलीला मैदानात कोणतेही उपक्रम करताना संस्थेची परवानगी घेण्यात यावा, असा मजकूर त्यात लिहिला गेला आहे. त्यामुळे नेरुळ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याअनुषंगाने ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी या प्रकरणातील महापालिका अधिकाऱ्यांचा गलथानपणा समोर आणला आहे. 

मागील ७ ते ८ वर्षात महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत करोडो रुपयांची नागरी विकासाची कामे रामलीला मैदानात करण्यात आली असून सदर मैदान जर सुरुवातीपासूनच तेरणा चॅरिटेबल संस्थेचे होते, तर महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या मैदानासाठी करोडोंची कंत्राटे का काढली? यात नवी मुंबईकर जनतेच्या कररुपी पैसा का वाया घालविण्यात आला? रामलीला मैदानासाठी महापालिकेने जे करोडो रुपये खर्च केलेत ते पैसे सदर प्रकरणात जबाबदार असलेल्या मालमत्ता विभाग आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांच्या पगारातून महापालिका आयुक्तांनी वसूल करण्याचे निर्देश द्यावे, सविनय म्हात्रे यांनी निवेदनपत्राद्वारे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एसटी बस कोसळली नाल्यात