अवघ्या २७ मिमी पावसात आठ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना

पहिल्याच पावसात नवी मुंबई शहरात आठ झाडे पडल्याची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिका उद्यान विभागाकडून  यंदा मान्सून पूर्व धोकादायक वृक्षांची  गणना करण्यास दिरंगाई झाली आहे आणि त्याचा प्रत्यय पहिल्याच पावसात आला असून मंगळवारी रात्री पडलेल्या अवघ्या  २७ मिमी पावसात आठ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळा सुरू होताच  शहारत जुनी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नित्याच्याच  घडत असतात. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वित्त हानी होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने  दर वर्षी मान्सूनपूर्व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ती झाडे पावसाळा पूर्वीच तोडण्यात येतात. तर काही झाडांच्या फांद्या छाटतात मागील वर्षी उद्यान विभागाने  मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अशी यादी प्रसिद्ध करून कार्यवाही केली होती. मात्र यंदा जून महिना अर्ध्यावर आला तरी वाशी विभाग वगळता इतर विभागातील धोकादायक वृक्षांची यादी जाहीर केली नाही. या पूर्वी सन २०२०, निसर्ग आणि  २०२१ तौकते चक्रीवादळात नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन वित्त हानी झाली होती. मात्र यंदाचा बिपर जॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र असे असले तरी मंगळवारी रात्री पडलेल्या अवघ्या  २७ मिमी पावसात आठ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेळीच शहरातील धोकादायक वृक्षांची छाटणी तसेच ती तोडून नाही टाकली तर आणखी झाडे पडण्याच्या घटना घडून मोठी वित्त हानी होऊ शकते? अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलीस, वाहतूक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, एमआयडीसी प्राधिकरणांशी कायम समन्वय ठेवण्याचे निर्देश