पोळी भाजी केंद्रचालकाने सोन्याचा वर्ख लावून बनवली पुरणपोळी

 नवीन पनवेल मध्ये सोन्याची पुरणपोळी

नवीन पनवेल : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. त्याचाच अनुभव नवीनपनवेलमध्ये आला आहे. पोळी-भाजी केंद्र चालकाने चक्क सोन्याचा वर्ख लावून पुरणपोळी बनवली आहे. सोन्याचा वर्ख देऊन बनवलेल्या दोन पोळ्यांपैकी एक मंदिरात तर दुसरी त्याच्या मित्राला भेट देण्यात आली.

नवीन पनवेल शहरातील नारायण कंकणवाडी यांच्या शिवा पोळी-भाजी सेंटर मध्ये सोन्याची पुरणपोळी बनविण्यात आली. उज्जैन मध्ये गेल्यानंतर कंकणवाडी यांना सोन्याची कुल्फी दिसली होती. त्यानंतर त्यांना आपण सोन्याची पुरणपोळी बनवावी, असे सुचले. त्यानुसार त्यांनी ११ जून रोजी सोन्याचा वर्ख लावून पुरणपोळी बनवली. त्यांचा सदर प्रयत्न यशस्वी झाला. सोन्याचा वर्ख दिलेल्या दोन पुरणपोळ्या त्यांनी बनवल्या.

शिवा पोळी-भाजी सेंटरमध्ये दररोज दोनशे हुन अधिक पुरणपोळ्या बनवल्याजातात. यातील दोन पोळ्यांना त्यांनी सोन्याचा वर्ख लावला. त्यातील एकपुरणपोळी पनवेल शहरातील शिवा विश्वनाथ महादेव पावन मंदिरात देवाच्या चरणी अर्पण करण्यात आली. तर दुसरी पोळी कंकणवाडी यांनी त्यांचे मित्र डॉ. वाय सोनटक्के यांना दिली. सोन्याचा वर्ख देऊन केलेली सदरची संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली पुरण पोळी असेल, असे नारायण कंकणवाडी म्हणाले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवघ्या २७ मिमी पावसात आठ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना