दोस्ती संस्थेच्या वतीने जनजागृतीपर नाटिका सादर

अवयवदान जनजागृतीसाठी मेडिकवर हॉस्पिटल्सचा अनोखा उपक्रम

नवी मुंबई : अवयवदानासारखे श्रेष्ठ दान करण्याचे आवाहन करत मेडिकवर हॉस्पिटल्स आणि दोस्त या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाबाबत जनजागृतीकरिता स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. रुग्णालयातील पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णांना शिक्षित करण्यासाठी अवयदान आणि आरोग्यसेवा दिंडीचा एक भाग म्हणून १२ जून रोजी मेडिकवर हॉस्पिटलच्या परिसरात दोस्त संस्थेच्या स्वयंसेवकांनी अवयवदान जनजागृतीवर आधारीत नाटिका सादर केली.

अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमज्रुती, निषिध्द, सामाजिक कलंक आणि या महत्त्वपूर्ण समस्येबद्दल जागरुकतेच्या अभावामुळे भारत अवयवदानाच्या कमतरतेशी झुंजत आहे. अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. प्रतिक्षा यादीतील अनेकांना अवयवांची नितांत गरज आहे. प्रत्येक दाता ८  लोकांना जीवनदान देऊ शकतो. अवयवांची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत मोठी असून ती दूर करणे गरजेचे आहे. सदर बाब लक्षात घेऊन मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

अवयव प्रत्यारोपण मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान सुधारु शकते. एका दात्याकडूनदान करता येणाऱ्या अवयवांमध्ये हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, फुपफुस, डोळे, त्वचा आणि आतडे यांचा समावेश होतो. अवयवदानाविषयी जागरुकता वाढवण्याची हीच योग्य वेळ असून यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीच्या उद्देशाने दोस्त संस्थेच्या साथीने रुग्णालयाने पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णांमध्ये जनजागृती केली. सुमारे १०० लोकांच्या उपस्थितीत अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारी नाटिका यावेळी सादर करण्यात आली. १० ते २६ जून 2023 या कालावधीत अवयव आणि आरोग्यसेवा दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मेडिकवर रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण-एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत आणि नेप्राेलॉजी-किडनी प्रत्यारोपण विभागप्रमुख डॉ. अमित लंगोटे यांनी दिली.  

या कार्यक्रमादरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर येथील वारकऱ्यांसोबत अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रवास करणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सदरचे एक उत्तम माध्यम ठरेल. अवयव दानासाठी आणखी मोहिम आणि उपक्रम हाती घेण्याचा रुग्णालयाचा निर्धार आहे, असे डॉ. विक्रम राऊत म्हणाले.

समाजात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करतो. लोक अवयव दानाकरिता पुढाकार घ्ोतील आणि ज्यांना अवयवांची गरज आहे त्यांना नवीन आयुष्य मिळेल यासाठी आम्हाला सुनिश्चिती करायची आहे. याशिवाय संस्थेतर्फे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय शिबिरे, औषधांचे वाटपही केले जाते.१०,०००हून अधिक नागरिक या वैद्यकीय शिबिरांचा लाभ घेतात. लाखो लोकांना अवयवदानाबद्दल जागरुकता निर्माण करत असल्याची माहिती ‘दोस्त संस्था'चे संस्थापक डॉ.  कैलाश जवादे आणि सचिव डॉ. गोविंद जवादे यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठेकेदारांचे हित जोपासणाऱ्या एनएमएमटी प्रशासनाविरोधात संतापाची भावना