६१४ महिला आणि मुली यांना व्यवसाय प्रशिक्षण

महापालिका समाजविकास विभागाच्या विविध योजनांचे २१ हजार ८७२ लाभार्थी; २० कोटी रुपये खर्च

तुर्भे : नवी मुंबई महापालिका समाजविकास विभाग तर्फे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांपैकी २४ योजनांचा नवी मुंबई शहरातील २१ हजार ८७२ व्यवतींनी लाभ घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेकडून उत्तम दर्जाच्या पायाभुत सुविधा पुरवण्यासह लोकहितार्थ योजना देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. या आर्थिक वर्षातही लोकहितार्थ योजना राबवण्यात येत असून, नवी मुंबई शहरातील गरजूनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात राबवण्यात आलेल्या लोकहितार्थ योजनांसाठी ३७ कोटी १९ लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी मार्च अखेर २० कोटी ७६ लाख रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुवत (योजना विभाग) श्रीराम पवार यांनी दिली.

महापालिका कार्यक्षेत्रातील महिला आणि मुली, मागासवर्गीय युवक आणि युवती, प्रकल्पग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात.
महिला आणि बालकल्याण घटकांकरीता कल्याणकारी योजनांचा १५ हजार ११२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये निराधार/ विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटित ७६ महिलांच्या मुलींच्या विवाहाकरीता प्रत्येकी ६५ हजार इतके अर्थसहाय्य देण्यात आले.

शासनमान्यता प्राप्त संस्थेमार्फत सर्वसाधारण गटातील गरजू, बेरोजगार, सुशिक्षित ६१४ महिला आणि मुली यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी संबंधित संस्थेला ३८ लाख रुपये देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील एका सामाजिक संस्थेला २१ हजार रुपयांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यवसाय करत असलेल्या ४ महिला बचत गटास (प्रत्येकी १० हजार) अर्थसहाय्य देण्यात आले. विधवा/ घटस्फोटित महिलांच्या ८४३ मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे तसेच आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतचे खुल्या गटातील १२ हजार ८७७ आणि मागासवर्गीय गटातील ३ हजार ४९७ तसेच १२वी नंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी संगणक, एम.बी.ए. यासारखे उच्च शिक्षण (पूर्णवेळ) घेत असलेल्या गुणवत्ताप्राप्त स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील २ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे अर्थसहाय्य देणे, नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील महाविद्यालयीन शिक्षण घ्ोणाऱ्या १ हजार ५०४ मुलांना शिष्यवृत्ती देणे, नवी मुंबई क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या १ हजार ६७१ मुलांना शिष्यवृत्ती देणे, नवी मुंबईतील दगडखाण बाधकाम/रेती/नाका कामगाराच्या २५ मुलांना शिष्यवृत्ती देणे, २७ अनाथ/निराश्रीत मुलांकरीता वार्षिक शैक्षणिक शुल्कासाठी (फी) अर्थसहाय्य देणे, अशा मिळून शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना एकूण १६ कोटी ९ लाख रुपये निधीचे वाटप करण्यात आले आहे, असे महापालिका उपायुवत (योजना विभाग) श्रीराम पवार यांनी सांगितले.

महापालिका तर्फे १ किंवा २ मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या ४० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. २ अनाथ मुलींच्या विवाहाकरीता १ लाख ३० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

१२ वी नंतरचे व्यावसायिक- वैद्यकिय, अभियांत्रिकी व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकरीता २ युवतीना एकूण ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या ३३१ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दुर्धर आजार असणाऱ्या महिलांना (एचआयव्ही, कॅन्सर, अर्धागवायू, क्षयरोग, हृदयरोग, रक्तातील गंभीर आजार, मज्जारज्जुचे गंभीर आजार, किडणीचे गंभीर आजार) उदरनिर्वासाठी ६६ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देण्यात आले. मागासवर्गीय घटकांकरीता कल्याणकारी योजने अंतर्गत आंतरजातीय विवाहाकरीता ३१ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान देण्यात आले. तसेच मागासवर्गीय घटकाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २४ मुलीच्या विवाहासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले. मागासवर्गीय घटका अंतर्गत महाविद्यालयीन अभियांत्रिकी संगणक प्रशिक्षण घेत असलेल्या लँपटॉप खरेदीकरीता ३ मुलींना अर्थसहाय देण्यात आले, अशी माहिती महापालिका उपायुवत (योजना विभाग) श्रीराम पवार यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दोस्ती संस्थेच्या वतीने जनजागृतीपर नाटिका सादर