२४ तासानंतर पाणी

अस्वच्छ पाण्याचा वापर कसा करायचा?

वाशी : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी १० जून रोजी पहाटे आदई गावाजवळ फुटल्याने तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी दिवसभर पाणी बंद ठेवण्यात आले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यानंतर ११ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, सदर पाणी एकदम लालसर, गढुळ, अस्वच्छ  आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. याठिकाणी जलशुध्दीकरण केंद्र तसेच नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र, तरीही नवी मुंबई शहरात सातत्याने अस्वच्छ पाणीपुरवठा होतच असतो. बुधवारी शहरात शट डाऊनमुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी कमी दाबाने पाणी आले. परंतु, दोन दिवसानंतर १० जून रोजी आदई गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने तातडीने काम करण्यासाठी दिवसभर नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. काम केल्यानंतर ११ जून रोजी सकाळी नळाला पाणी आले. मात्र, एकदम लालसर मातीचे पाणी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत ‘अस्वच्छ पाण्याचा वापर कसा करायचा?',  असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिका नवीन मुख्यालय इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार