शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
मुंबई उपनगरीय लोकलच्या इतिहासातील पहिलीच वेळ
लोकलमधील सहप्रवाशाचा सेवानिवृत्ती उपरांत सत्कार
नवी मुंबई : शहराची लाईफलाईन असलेल्या उपनगरी हार्बर लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे नियमित प्रवासी एकनाथ माने यांना त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सहकाऱ्यांनी ट्रेनमध्येच फेअरवेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या फेअरवेल पार्टी बघून सदर ट्रेन मधून प्रवास करणारे इतर प्रवासी आश्चर्यचकित झाले.
खांदेश्वर येथील रहिवासी असलेले एकनाथ माने (वय ६० वर्ष) ३० वर्षांहून अधिक काळ एकाच ट्रेन आणि डब्यातून सहकाऱ्यांसोबत ये-जा करीत असत. जवळपास तीन दशकांपासून डब्यातील परिचित चेहरा असलेले माने सहप्रवासी आणि इतर प्रवाशांशी मित्र म्हणून ओळखले जातात. मुंबईत एका खाजगी संस्थेत काम करणारे एकनाथ माने ३१ मे २०२३ रोजी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे लोकल ट्रेन मध्ये माने यांच्यासाठी त्यांच्या सहकारी प्रवाशांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. त्यासाठी लक्ष्मण आगरकर यांनी पुढाकार घेतला. आगरकर देखील एक दशकाहुन अधिक काळ माने यांच्यासोबत प्रवास करीत आहेत. यावेळी माने यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लोकल ट्रेनमध्ये अशाप्रकारे निरोप समारंभानिमित्त पार्टीचे आयोजन करण्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे, असे आगरकर म्हणाले.
दरम्यान, आपल्या सहकारी प्रवाशांनी सेवानिवृत्तीउपरांत फेअरवेल पार्टीसाठी केलेली व्यवस्था पाहून मला आश्चर्य वाटले. अशा प्रकारे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होईल याची अपेक्षा देखील नव्हती. पण, तरीही सहकाऱ्यांनी दिलेली फेअरवेल पार्टी कायम स्मरणात राहील, असे सत्कार मुर्ती एकनाथ माने म्हणाले.