दिवंगत कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली

कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

पनवेल : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे  यांचे पाचवे पुण्यस्मरण ९ जून रोजी खांदा कॉलनी येथे त्यांच्या सुकन्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी आयोजित केले होते. स्व.शाम म्हात्रे पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकीतून त्यांची सुकन्या श्रुती यांनी आई एकविरा जनकल्याण संस्था गोशाळेला आर्थिक सहकार्य करून मदतीचा हात दिला. सदर मदत समाज प्रबोधनकार ह.भ.प सौ.कलावतीताई शिवकर, केळवणे यांना सुपूर्द केली.


विविध पक्षातील नेते कार्यकर्ते समस्त कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील विविध ठिकाणातील रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. आगरी शिक्षण संस्थेमध्ये, गणेश मार्केट आणि काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको उलवे गृहप्रकल्पातील बांधकाम मजुरांना १५०० मच्छरदाणींचे वाटप