शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी'ची रौप्य महोत्सवी वाटचाल
बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित सानपाडा या संस्थेचा रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा संपन्न
नवी मुंबई : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित सानपाडा या संस्थेचा रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ३५० व्या सोहळ्या निमित्त श्री सत्यनारायण महापुजा आणि ‘शोभायात्रा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संमेलन देखील संपन्न झाले.
बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्या. यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पणकरत आहे. गेली २५ वर्ष पतपेढीचे सभासद, सदस्य आणि ठेवीदार यांच्यासहकार्याने पतपेढीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सानपाडा येथील नटराज को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. येथे असलेल्या प्रशासकीय कार्यालयातून बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे कामकाज केले जाते. नवी मुंबई सह मुंबई, ठाणे, पुणे, मंचर, आदि ठिकाणच्या १४ शाखांच्या माध्यमातून १५० कोटची उलाढाल व्यवसाय असलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असलेली बल्लाळेश्वर पतसंस्था आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे.त्याअनुषंगाने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, समाजसेवक मिलिंद सूर्यराव, भाऊ भापकर, पांडुरंग आमले यांची उपस्थिती होती.
‘हिंदवी स्वराज्य'चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा ३५० वे वर्ष असल्याने, राज्यभरात मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने ‘बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी'च्या वतीने संस्थेचे प्रशासकीय कार्यालय ते सानपाडा सेवटर-८ मधील देवस्थ मराठा भवन दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या ‘शोभायात्रा'मध्ये शिवप्रेमी, संस्थेचे सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर मराठा देवस्थ भवन येथे सभा, संमेलन पार पडले.
‘बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी'चे अध्यक्ष दामाजी नाना डोंगरे, उपाध्यक्ष सुनिता रमेश डोंगरे, सदस्य सुरेश सबाजी गावडे, बाबुराव चिमाजी डोंगरे, मनोहर चिमाजी डोंगरे, भगवान भीमराव शेटे, रमेश यशवंत धुमाळ, बबन बाबुराव कुटे, नीता आनंद गावडे, खडू भाऊराव आहेर, जगन्नाथ भिमाजी दाते, सल्लागार जयश्रीताई आहेर, आदि मान्यवर तसेच सस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.