हृदयाला छिद्र असलेल्या मुलीला जीवनदान

१६ महिन्यांच्या ओवीवर ट्रान्सकॅथेटर डिव्हाईस क्लोजर प्रक्रिया यशस्वी

नवी मुंबई : जन्मतःच हृदयामध्ये छिद्र असलेल्या १६ महिन्यांच्या चिमुरडीवर सीबीडी मधील अपोलो हॉस्पिटल्स मध्ये ट्रान्सकॅथेटर डिव्हाईस क्लोजर प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आले. त्यामुळे अपोलो हॉस्पिटलने १६ महिन्यांच्या ओवीला जीवनदान दिले आहे.

१६ महिन्यांच्या ओवीवर सेकंडम एट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) किंवा हृदयाच्या वरच्या चेंबर्समधील (कक्षातील) भितींच्या मध्यभागी असलेल्या छिद्राचे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाईस क्लोजर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये उजव्या ऊरु-शिरांच्या माध्यमातून इन्फेरिअर वेना कावाच्या (आयव्हीसी) फुग्याच्या विस्तारासह (बलून डिलेटेशनसह) १८ मि.मी. ॲम्प्लॅटझसारख्या सेप्टल ऑक्ल्युडर उपकरणाचा वापर केला जातो.

ओवीला कोणत्याही सक्रिय तक्रारी नव्हत्या. पण, तपासणी केल्यावर तिच्या वयानुसार तिची वाढ अपुरी होत असून तिचे वजन आणि उंची देखील कमी असल्याचे आढळून आले. जन्माच्या वेळी ओवीचे गुदद्वार सामान्यपणे उघडत नव्हते, ते छिद्रहीन देखील होते. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर एक शस्त्रक्रियाविरहित उपचार पध्दती असून ती एएसडीच्या उपचारांसाठी सुरक्षित आहे.

सामान्य भूल अंतर्गत ओवीच्या हृदयाच्या डाव्या आणि उजव्या ॲट्रिया वरच्या चेंबर्समधील छिद्रांद्वारे विशेषतः रक्त प्रवाह थांबवण्यासाठी तयार केलेले उपकरण वापरुन तिच्यावर एएसडीचे ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रक्रियेनंतर ओवीला त्याच अवस्थेत बालरोग आयसीयूमध्ये हलवण्यात येऊन तिला हेमोडायनामिक स्वरुपात (रक्तसंचारण प्रकरण) स्थिर ठेवण्यात आले. ओवीची वाढ अपुरी असल्यामुळे इकोकार्डिओग्राफी करण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एएसडी दिसून आले. सेकंडम ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट एक हृदयविकाराचा प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला जन्मतःच हृदयात छिद्रे असतात. या विकारात हृदयाच्या दोन भागांतून, प्रणालीगत आणि फुपफुसीय अभिसरणातून रक्त मिसळले जाते, मुळात असे घडू नये. यामुळे हृदयाच्या कार्यावर आणि प्राणवायूच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सामान्यतः सेकंडम एएसडी असलेल्या लोकांमध्ये बालपणात आणि पौगंडावस्थेत लक्षणे दिसत नाहीत. तरीही उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशी गुंतागुंत वयानुसार वाढू शकते आणि आयुर्मान कमी करु शकते. ओवीच्या बाबतीत गुदद्वाराच्या विकृतीवर उपचार केल्यानंतरही तिची वाढ होण्यास लक्षणीयरित्या अपशय आले. याचे कारण श्वसनमार्गामध्ये वारंवार होणारे संक्रमण लवकरात लवकर एएसडी बंद करणे आवश्यक होते. हृदयातील छिद्र बंद करण्यासाठी शस्त्रक्रियेपेक्षा ट्रान्सकॅथेटर तंत्र अधिक योग्य आहे. ओवीचे लहान वय आणि कमी वजन लक्षात घेता एएसडीचे ट्रान्स-कॅथेटर डिव्हाइस क्लोजर सर्वोत्तम उपाय असल्याचे निश्चित करण्यात आले. अखेर सदरची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामध्ये ओवीने चांगली साथ दिली, असे अपोलो हॉस्पिटल्सचे बाल हृदयरोगतज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, ओवीचे जीवन वाचवल्याबद्दल ओवीच्या आई बोरकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत रुग्णालयाचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त नार्वेकर यांची विविध सेवटर्स मध्ये चालत जाऊन स्वच्छता कार्याची पाहणी