पडलेले झाड उचलण्याचा उद्यान विभागाला विसर

उद्यान विभाग सुस्त; नागरिक त्रस्त

नवी मुंबई : नेरुळ, सेवटर-१, एनएल-२ परिसरात ६ जून रोजी एक झाड अचानककोसळल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार तत्काळ संबंधित विभागाकडे  केली. परंतु, घटनेच्या ४८ तासानंतरही ८ जून उजाडले तरी सुध्दा पडलेले झाड रस्त्याच्या मधोमध टाकून महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी आपला सुस्त कारभार सिध्द केला असल्याची खंत माजी नगरसेविका सौ. माधुरी जयेद्र सुतार यांनी व्यवत केली आहे.

विशेष म्हणजे वादळवारा, सोसाट्याचा वारा अशी कोणतीही आपत्ती नसतानाही सदरमोठे झाड अचानकपणे पडले. यामध्ये रहिवाशी सोसायटीचे कंपाऊंड तुटले, एका रिक्षाचे देखील नुकसान झाले. त्यामुळे सदर प्रकाराला उद्यान विभागाच जबाबदार आहे. त्यांनी पावसाळ्यापूर्वी करावयाची वृक्ष छाटणी शिरवणे गांव आणि नेरुळ, सेवटर-१ परिसरात केलेली नाही. तसेच पडलेले झाड मुख्य रस्त्याच्या प्रवाहात त्याच अवस्थेत टाकून ठेवल्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. एकंदरीत उद्यान विभागाच्या सदर जबाबदारी बाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याचे सौ. माधुरी सुतार यांनी सांगितले.

दरम्यान, आपण स्वतः तुटलेले झाड हटविण्याबाबत सतत दोन दिवस पाठपुरावा केला. तरीसुध्दा उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता देवावरच भरवसा ठेवून कार्यवाही कधी होते? ते पाहणे औत्सुवयाचे ठरेल, असे सौ. माधुरी सुतार म्हणाल्या.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता मधील सातत्य टिकवून ठेवण्याचे आयुवत राजेश नार्वेकर यांचे रहिवाशांना आवाहन