शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना वृक्षरोप वाटप

पर्यावरण दिन निमित्त आरटीओ कार्यालयाचा आगळा-वेगळा उपक्रम

नवी मुंबई : दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), नवी मुंबई आणि वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरटीओ कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी आलेल्या अभ्यांगतांना वृक्षरोप वाटप करण्यात आले.

वृक्षरोप वाटप उपक्रमात १०० विविध प्रकारची वृक्षरोपे वाटप करण्यात आली. तसेच १० वृक्षरोपांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चाचणी मैदानात लागवड करण्यात आली, अशी माहिती ‘वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी संस्था'चे पदाधिकारी निलेश कचरे यांनी दिली.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी, वृक्ष संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, या उद्देशाने आरटीओ कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना १०० पेक्षा अधिक वृक्षरोपे वाटप करण्यात आली, असे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेऊन आपला परिसर हरित आणि निसर्ग सौंदर्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी नागरिकांना केले.

निसर्ग संवर्धन जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, वाढते प्रदूषण, वाढते शहरीकरण या मानव निर्मित कृत्यांचा परिणाम लक्षात घेता वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे, असे यावेळी निलेश कचरे यांनी नमूद केले.

वृक्षरोप वाटप कार्यक्रमास सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल नाबदे, राजेश भोईर, धनंजय पाटील, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'चा वर्धापन दिन वाशी मंडळ तर्फे उत्साहात साजरा