एमआयडीसी मध्ये मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीच्या कामांना बगल?

पावसाळ्यात एखादे झाड पडून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

नागरिकांचा संतप्त सवाल

वाशी : नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी असे तीन नियोजन प्राधिकरण असून, तिघांचे स्वतंत्र उद्यान विभाग आहेत. मात्र, एमआयडीसीकडून मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी तसेच धोकादायक वृक्षांची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात एखादे झाड पडून दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई मधील एमआयडीसी क्षेत्रात नवी मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत सर्व कामे पाहिली जात होती. मात्र, २०१६ मध्ये ‘एमआयडीसी'ने स्वतःचे स्वतंत्र वृक्ष प्रधिकारण स्थापित केले. तेव्हा पासून एमआयडीसी भागात वृक्ष तोड, स्थलांतर, वृक्षारोपण आदी कामे केली जात आहेत. मात्र, सदर कामे करत असताना एमआयडीसी द्वारे मान्सूनपूर्व कामांना बगल दिली जात आहे. पावसाळ्यात संभाव्य धोका पाहता नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग धोकादायक वृक्षांची गणना करुन आवश्यक झाडे तोडते. तसेच झाडांच्या अवांतर फांद्यांची देखील छाटणी करते. मात्र, एमआयडीसी कडून झाडांच्या बाबतीत मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीला तसेच धोकादायक वृक्ष गणना कामाला पुरती बगल दिली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात एमआयडीसी भागात एखादे झाड पडून दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न नागरिकांकडून आता उपस्थित होत आहे.

महापे एमआयडीसी परीक्षेत्रात मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्याची छाटणी तसेच धोकादायक वृक्ष गणना केली जात नाही. -  अशोक सावकारे, उप अभियंता - भाग २, एमआयडीसी, महापे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याची पणन विभागाची तयारी