विश्व पर्यावरणदिनी ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या वतीने वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनी लावली पर्यावरणपूरक दहा झाडे

नवी मुंबई : विश्व पर्यावरण दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ व आईस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ येथील श्रीमद आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य उद्यान येथे ५ जून रोजी माजी नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के यांच्या उपस्थितीत व सहकार्याने वृक्षारोपण सोहळा पार पडला. याप्रसंगी वड, पिंपळ, आंबा, फणस, कडुलिंब अशी पर्यावरणपूरक दहा झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, तसेच पांडुरंग क्षेत्रमाडे, अण्णासाहेब टेकाळे, नामदेव डफळ,  दीपक दिघे,  सौ. स्वाती फडके, प्रभाकर गुमास्ते,  रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, अजय माढेकर, रमेश गायकवाड,  सुभाष हांडे देशमुख, दत्ताराम आंब्रे, सौ. सुचित्रा कुंचमवार, सौ. रजनी कलोसे, विजय सावंत आदी मांन्यवर व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत संघाच्या सक्रिय सदस्या सौ. सुचित्रा कुंचमवार यांचा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या वृक्षारोपण सोहळ्याप्रसंगी सौ. नेत्रा शिर्के, अरविंद वाळवेकर, अण्णासाहेब टेकाळे, नामदेव डफळ, सौ. स्वाती फडके, सौ. प्रतिभा कुलकर्णी आदी मान्यवरांनी पर्यावरणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. नेत्रा शिर्के यांनी पर्यावरणात नवी मुंबई महानगरपालिकेचा वाटा किती महत्त्वाचा आहे व पर्यावरण संवर्धनाबाबत पालिकेतर्फे जाणीवपूर्वक झालेले काम विषद केले. तर अरविंद वाळवेकर यांनी गेली अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक संघाने विविध माध्यमांद्वारे पर्यावरण संरक्षण कसे केले व करत आहे याचा तपशीलवार आढावा घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी अजय माढेकर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले. उत्कर्ष ज्येष्ठ महिला मंडळ, संघाचे रुग्णसेवा विभागाचे पदाधिकारी व संघाच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका द्वारे तोडक कारवाई