‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल'चा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक

‘रोटरी क्लब'तर्फे ‘स्त्री मुवती संघटना'च्या कचरावेचक महिलांना शेड, २ ई-टेम्पो प्रदान


नवी मुंबई : स्वच्छतेमध्ये सातत्याने देशातील मानांकन उंचाविणारे शहर म्हणून ‘नवी मुंबई'चा नावलौकिक होत असताना प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण स्वच्छता संकल्पना आणि उपक्रम राबविण्यामध्ये नवी मुंबई महापालिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. शून्य कचरा असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिकेने अनेक अभिनव उपक्रम राबविले असून झोपडपट्टी भागातील कचऱ्याची त्याच भागात विल्हेवाट लावली जावी यादृष्टीने प्रायोगिक स्वरुपात ५ झोपडपट्ट्यांमध्ये सुरु केलेला झिरो वेस्ट स्लम मॉडेल उपक्रम राष्ट्रीय पातळीवर नावजले गेले आहे. केंद्रीय स्तरावरुन इतरांनी अनुकरण करावा असा प्रकल्प म्हणून त्याची वाखाणणी झाली आहे असे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेत ‘स्त्री मुवती संघटना'च्या कचरा वेचक महिलांनी केलेल्या सेवाभावी कामाचा गौरव केला.

सीबीडी-बेलापूर, सेवटर-२१ येथील उड्डाणपुलाजवळील जागेत महापालिकेच्या वतीने रिचाल्ड कंपनीच्या सीएसआर फंडामधून, ‘रोटरी क्लब ऑफ नेरुळ सी-साईड चॅरिटेबल ट्रस्ट'च्या सहयोगातून, कचरावेचक महिलांकरिता सुका कचरा संकलनासाठी शेडची उभारणी तसेच सुका कचरा ने-आण करण्यासाठी २ ई-टेम्पो देण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या सुविधांचा ३ जून रोजी शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी महापालिका शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, ‘स्त्री मुवती संघटना'च्या मुख्य समन्वयक प्रा. वृषाली मगदूम, ‘रोटरी वलब'चे पदाधिकारी अनिल करता, अशोक गोपालन आणि सिन्हा आणि इतर पदाधिकारी तसेच माजी नगरसेविका सरोज पाटील, ‘अन्वय प्रतिष्ठान'चे डॉ. अजित मगदूम उपस्थित होते.

‘स्त्री मुवती संघटना'चे कार्य केवळ कचरा निर्मूलन आणि स्वच्छता यापुरते मर्यादित नाही तर कचरावेचक महिलेच्या कुटुंबाचा विकास करण्याकडे संस्थेमार्फत विशेष लक्ष दिले जाते. सध्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या ‘थ्री आर या अभियान'ला शेडच्या माध्यमातून हातभार लागणार असल्याचे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दर सहा महिन्यांनी या महिलांसाठी आरोग्य शिबीर आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्याबाबत आयुक्तांनी सूतोवाच केले. स्तुती काते या कचरावेचक महिलेच्या मुलीने दहावी एसएससी परीक्षेत ९१ टक्के गुण संपादन केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

‘स्त्री मुवती संघटना'च्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी महारपालिकेचे कचरा वेचक महिलांच्या पाठीशी असणारे सहकार्य आणि पाठबळ यामुळे या महिलांचा आर्थिक विकास होत असल्याचे सांगितले. ‘रोटरी वलब'च्या पुढाकारातून मिळालेल्या शेड आणि २ ई-टेम्पो मुळे महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार असून महिलांमधील नेतृत्वाची क्षमता पुढे येऊन आगामी फळी तयार होत आहे असे सांगत वृषाली मगदूम यांनी महापालिका आणि रोटरी क्लब यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे यांनीही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गेली दोन दशके कचरावेचक महिलांना सहकार्य केले जात आहे, प्रोत्साहन दिले जात आहे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन मदत केली जात आहे, असे सांगितले. थ्री आर आर उपक्रमातही कचरावेचक महिलांना सामावून घेतले जाईल, असेही डॉ. राजळे म्हणाले.
‘रोटरी क्लब ऑफ नेरुळ सी साईड'चे अनिल करता यांनी शेडसाठी रिचाल्ड कंपनीच्या माध्यमातून व्यक्तीशः लक्ष देऊन शेड आणि २ ई-टेम्पो कचरा वेचक महिलांच्या सक्षमीकरणासाठी देण्याची संधी लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या पुढील काळातही अशीच मदत करत राहू, असे सांगितले.

यावेळी ‘परिसर सखी विकास संस्था'च्या अध्यक्ष रुक्मिणी पॉल यांनी आभार प्रदर्शन केले. तर सीमा किसवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू चौधरी, मिलन जाधव, मीनाक्षी वांगणेकर, जयश्री वरपे, संगीता साबळे, आशा गायकवाड, दीपा पांढरपट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष