सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष 

नेरुळ मधील ‘पे अँड पार्किंग'मध्ये गॅस वितरण व्यवसाय

वाशी : नेरुळ रेल्वे स्थानक जवळ सिडको मार्फत ‘पे अँड पार्किंग'ची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सदर ठिकाणी  ठेकेदाराच्या संगमताने गॅस वितरणाचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘वाहन पार्किंग'साठी जागा अपुरी पडत असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे सिडको प्रशासनाने पुरते दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे.

नवी मुंबई शहरात सिडको द्वारे अद्ययावत रेल्वे स्थानके उभारण्यात आली आहेत. या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या वाहनांसाठी सुलभ ‘पे अँड पार्किंग' तत्वावर वाहन तळ बनवण्यात आले आहेत. ‘पे अँड पार्किंग' व्यवस्था अटी शर्तीच्या अधीन राहून खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यात आली आहे. मात्र, सदर ‘पे अँड पार्किंग' ठेकेदारांकडून अटी शर्तीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्याचा प्रत्यय नेरुळ रेल्वे स्थानक मधील पे अँड पार्किंग मध्ये येत आहे. या ठिकाणी ठेकेदाराच्या संगमताने गॅस वितरणाचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना जागा भेटत नाही. तसेच या ठिकाणी भंगार रिक्षा आणि इतर जड वाहने उभी करुन जागा अडवून ठेवली आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त करत सदर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांनी एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करुन पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा