वृक्षारोपण करून साजरी केली वटपौर्णिमा

नेरूळ मधील आर्यवर्त फाउंडेशन तर्फे  वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

नवी मुंबई -: वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पूजा करतात .तर शहरी भागात  जवळपास झाड नसेल तर त्याची फांदी आणून पूजा करतात. मात्र याने पर्यावरणाची हानी होते.त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व विधीही व्हाव्या या संकल्पनेतून नेरूळ मधील आर्यवर्त फाउंडेशन तर्फे  वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. 

वटपौर्णिमा हा सौभाग्यवर्धन आणि आयुष्यवर्धन असणारा सण आहे.त्यामुळे अधिक जीवन असणाऱ्या वडाच्या झाडाला दोरा बांधून आपल्या सौभाग्यासाठी महिला पूजा करतात. वड आणि पिंपळाची झाडे ही नैसर्गिक ऑक्सिजनचा खूप मोठा स्त्रोत्र आहेत. म्हणून या वटपौर्णिमा  सणानिमित्त आर्यवर्तन फाउंडेशन तर्फे वडाचे, पिंपळाचे आणि नारळाचे झाड लावून त्यांचे पूजन करण्याचे कार्यक्रमाचे आयोजन नेरूळ मध्ये केले होते.  या कार्यक्रमात पुरुष मंडळींनी वड- पिंपळाची झाडे लावली, तर महिलांनी त्या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेऊन पूजा केली. अशा पद्धतीने स्त्री पुरुष सर्वांनी मिळून एक आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी या अनोख्या वटपौर्णिमेचे स्वागत केले आणि दरवर्षी वटपौर्णिमेला एक तरी वडाचे झाड लावू असा संकल्प केला.यावेळी भाजप महिला मोर्चाच्या मंगल घरत,राज कोठारी,  प्रवीण गावडे, विनायक गिरी,  संतोष ढेंबरे,  अंजनी सैनी, सुषमा निघोट, पूजा गावडे, स्मिता जाधव, सौ विमल पेरवी,  राणी ढेंबरे,  लीलावती ढेंबरे आदी उपस्थित होते

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 झोपड्यांवर एमआयडीसी प्रशासनाची कारवाई