८५ दानशूर दात्यांनी दिलेल्या अर्थसहकार्यातून १४० मुलांवर केल्या मोफत शस्त्रक्रिया

हृदयविकार पिडीत मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारला १.९२ कोटी रुपयांचा निधी

नवी मुंबई ः खारघरच्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल येथे गेल्या तीन वर्षांत जन्मजात हृदयविकाराने पिडीत ३४८ मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या सहकार्याने करण्यात आल्या असून त्यामुळे मुलांना नव्या आयुष्याची भेट मिळाली आहे. रोटरी क्लबने ८५ दानशुर व्यक्ती तसेच संस्थांकडून सुमारे १.९२ कोटी रुपये जमा करत त्या पैशातून १४० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या साऱ्या प्रक्रियेत जवळून काम करणारे  क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शस्त्रक्रिया केलेल्या मुलांना ‘गिपट ऑफ लाईफ' हे प्रमाणपत्र दिले. जन्मजात हृदयविकारांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि वेळीच उपचार तसेच वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही गावस्कर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष  सुवेंदू मिश्रा सांगतात की, प्रत्येक बालकाला त्यांच्या वुÀटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे उपचारास मुकावे लागणार नाही आणि आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाव्यात हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही विनामूल्य शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी प्रवेश प्रदान करतो जे अनेक कुटुंबांसाठी परवडणारे नसतात. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि ५ रोटरी डिस्ट्रिक्ट्‌स आणि आंतरराष्ट्रीय क्लबसह ९ क्लब एकत्र येऊन जन्मजात हृदयरोग (ण्प्) ग्रस्त मुलांच्या उपचारासाठी निधी उभारला गेला आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे ८५ देणगीदारांकडून १.९२ कोटींचे योगदान मिळाले आहे, ज्याचा उपयोग १४० मुलांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार देण्यासाठी केला जाईल. श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सी. श्रीनिवास सांगतात की सीएचडी ही एक समस्या आहे जी दरवर्षी लाखो मुलाना प्रभावित करते. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टला मदत करण्यासाठी खारीचा वाटा उचलता आल्याने आम्हाला अभिमान वाटतो. श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ स्नेहल कुलकर्णी, यांनी सांगितले की जन्मजात हृदयरोग हा एक प्रकारचा हृदयविकार आहे जो जन्मतः दिसून येतो आणि त्यावर उपचार न केल्यास गंभीर आरोग्य गुंतागुंत होऊ शकते. सीएचडी असलेल्या मुलांना त्यांची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी विशेष वैद्यकीय काळजी आणि उपचारांची आवश्यकता असते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महाराष्ट्र भवन'ची उभारणी ‘सिडको'ने करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश