तंबाखू विरोधी मोहिमेसाठी एकवटल्या नवी मुंबईतील स्वयंसेवी संस्था

 तंबाखू विरोधी दिनी नवी मुंबईतील संघटनांचा तंबाखू विरोधी एल्गार

नवी मुंबई ः जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी अन्वय नशा मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लव शर्मा दिग्दर्शित अर्थवाही पथनाट्य सादर करण्यात आले. तंबाखू व्यसनापासून दूर राहण्यासाठी शिक्षक मधुकर वारभुवन स्फूर्ती गीते गायिली. यानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम, उपचार केंद्रे इत्यादी विषयक माहिती असलेली पत्रके रिक्षा, बस चालकांना तसेच पादचाऱ्यांना वाटण्यात आली. या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारीज, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ वाशी,  चेतना फाउंडेशन, म्युझिक ॲण्ड ड्रामा सर्कल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इत्यादी संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.  ‘अन्वय' चे संचालक डॉ अजित मगदूम यांनी प्रास्ताविक केले. कविता नायर भाटिया, शुभांगी दीदी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. अभिनेते अशोक पालवे, समाजसेविका अमरजा चव्हाण, अशोक निकम, अनिल लाड, उदय तिळवे, मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, वृषाली मगदूम, जीवन निकम, लता कोठावळे, पुष्पा कांबळे, प्रज्ञा बडवे, शीतल सारंग, नयन म्हात्रे, आदिंनी याप्रसंगी सक्रिय उपस्थिती दर्शवली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वंडर्स पार्क प्रवेशासाठी ४० ते ५० रुपये शुल्क