मेगा इंडस्ट्रीयल एक्सपोनिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येणार

वाशीमध्ये उद्यापासून तीन दिवसीय महाइंडेवस मेगा इंडस्ट्रीयल प्रदर्शन

नवी मुंबई : सिडको प्रदर्शनी केंद्र, वाशी येथे १ ते ३ जून दरम्यान चेंबर ऑफ स्मॉल  इंडस्ट्रीज असोसिएशन महाइंडेवस मेगा इंडस्ट्रीयल एक्सपो भरवणार असून यानिमित्त मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना. कपिल पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या महाप्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील ३५ ओद्योगिक संघटना एकत्र येत असून जवळपास १५० उद्योजकांची विविध उत्पादने तेथे प्रदर्शित केली जाणार आहेत.

या एक्सपोची माहिती देण्यासाठी ३० मे रोजी वाशीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चेंबरचे अध्यक्ष संदीप पारिख यांनी सांगितले की एमएसएमईला रास्त व्यासपीठ मिळवून देण्याचा आपला उद्देश आहे. अनेक लघु व मध्यम उद्योजकांना सरकारी योजनांमधून काय काय मिळते याचाच पत्ता नसतोे. या एवस्पोनिमित्त आयोजित परिसंवादात याबद्दलची माहिती देण्यासाठी विशेष तज्ञ ववते बोलवण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. सदर पत्रकार परिषदेस चेंबरचे महासचिव निनाद जयवंत, टीसाच्या श्रीमती सुजाता सोपारकर याही उपस्थित होत्या. चेंबरचे उपाध्यक्ष भावेश मारु यांनी एकट्या ठाणे जिल्ह्यातून छोट्या उद्योगांच्या माध्यमातून ४१ हजार कोटींची निर्यात केली जात असल्याची माहिती दिली. तर चेंबरच्या गुजरात चॅप्टरचे प्रमुख विजय जोशी यांनी राज्यातील सर्वात अधिक (१७) एमआयडीसी या ठाणे जिल्ह्यात असून त्यामार्फत २९ % रोजगारनिर्मिती झाली असल्याचे सांगितले. या प्रदर्शनाला महाराष्ट्र शासनाचेही पाठबळ लाभले असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊ केला आहे. आठ देशांचे राजदूतही या एवस्पोला उपस्थिती दर्शवणार आहेत. लघुद्योजकांच्या प्रगतीचा लेखाजोखा सर्वांसमोर यावा, त्यांना वेगळे व्यासपीठ मिळावे, सार्वजनिक उद्योग आणि उद्योग क्षेत्रातील मोठ्या उद्योग घटकांना एकमेकांशी जोडून घेणे हाही या प्रदर्शनामागचा हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या एवस्पोसाठी दहा हजाराहुन अधिक भेटकर्ते उपस्थिती दर्शवतील असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला. सकाळी १०.३० ते सायं.६.०० अशी या प्रदर्शनाची वेळ आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुनियोजित नवी मुंबई शहराला बकालपण