‘मुर्तस्वरुप...राग गौड मल्हार'चे प्रकाशन

‘राग गौड मल्हार'वरील लघुचित्रपटाचे प्रकाशन

ठाणे : शंकर नाथा प्रतिष्ठान निर्मित, अनुसया आर्टस्‌ र्स्शिित, पंडीत परेश जाना यांच्या संकल्पनेवर आधारित, शास्त्राीय संगीताच्या सुरांवर बनवलेल्या मूर्तस्वरूप... राग गौड मल्हार या माहितीपटाचे (लघुचित्रपट) प्रकाशन सुप्रसिध्द गझल गायक पद्मश्री पंकज उधास यांच्या हस्ते नुकतेच ठाणे येथे संपन्न झाले.

आजपर्यंत आपण असंख्य राग ऐकले; पण एकही राग प्रत्यक्ष पाहून अनुभवला नसल्याने पंडीत परेश जाना यांना रागाचे अवतार दाखविण्याची अभिनव कल्पना सुचली होती. आणि याच अभिनव कल्पनेतून ‘शंकर नाथा प्रतिष्ठान'ने भारतीय शास्त्राीय संगीत रागांवर आधारित मूर्तस्वरूप... राग गौड मल्हार माहितीपट (लघुचित्रपट) तयार केल्याची माहिती या लघुचित्रपटातील गायिका तथा ठाणे पोलीस आयुवतालयातील पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी दिली.

‘शंकर नाथा प्रतिष्ठान'चे अध्यक्ष ईश्वर खैरमोडे यांनी या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन अनुसया आर्टस्‌चे शिरीष पवार यांनी केले आहे. संगीत आणि गायन पंडीत परेश जाना यांचे आहे. विशेष म्हणजे या लघुचित्रपटात गायनासह अभिनय साकारला आहे, तो पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी. त्यांच्यासोबत मनोज रवींद्र यांनी देखील या लघुचित्रपटात अभिनय साकारला आहे. चित्रपटाचे रेकॉर्डिंग हेडरुम स्टुडिओ, मुंबई येथे झाले आहे.

दरम्यान, सदर माहितीपटाच्या (लघुचित्रपट) प्रकाशनानंतर पद्मश्री पंकज उधास यांनी रुपाली अंबुरे यांनी ‘राग गौड मल्हार'वर लघुचित्रपट बनविण्याच्या प्रयत्नाचे खूप कौतुक केले. संगीत एक आध्यात्मिक साधना आहे आणि कलाकार हा नेहमीच उत्कटतेने चालतो. जर तुमच्याकडे पॅशन नसेल तर तुम्ही कलात्मकता मिळवू शकत नाही. हीच गोष्ट या लघुचित्रपटात दिसते. टीमने चित्रपट बनवून समाजासाठी मोठे काम केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचणार असून लोकांना ते संगीत आता पाहता देखील येणार असल्याचे पद्मश्री पंकज उधास यावेळी म्हणाले.

सदर चित्रपटाच्या प्रकाशन प्रसंगी संगीतकार कमलेश भडकमकर, नृत्यांजली दिग्दर्शक तुषार गुहा, अन्नोन्ना गुहा, गझल गायक प्रदीप उधास, प्रसिध्द शायर याकमी, कवी प्रथमेश पाठक, लेखिका शिल्पा कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर अनोख्या चित्रपटाचे कौतुक करुन गायिका रुपाली अंबुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सीआरझेड कॅश रियलायजेशन झोन नव्हे