उचित कार्यवाही करण्यासाठी पुरातत्व विभाग संचालकांच्या सूचना

काफरी देवस्थान'ची पुरातन देवस्थान म्हणून नोंद करण्याची मागणी

वाशी ः नवी मुंबई मधील ठाणे-बेलापूर मार्गावरील गणेश हायजींग या खाजगी कंपनीच्या आवारातील ‘काफरी देव देवस्थान'ची  पुरातन देवस्थान म्हणून नोंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय यांच्याकडे केली होती. त्यानुसार पुरातत्व खात्याच्या संचालकांनी सहाय्यक संचालक रत्नागिरी विभाग यांस उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावरील गणेश हायजींग या कंपनीच्या आवारात तुर्भे गाव ग्रामस्थांचे काफरी देव देवस्थान आहे. सदर देवस्थान एमआयडीसी विकसित होण्याआधी पासूनच आहे. त्यामुळे जुन्या मालकाने काफरी देव देवस्थान तुर्भे ग्रामस्थांना नेहमीच दर्शनासाठी खुले ठेवले होते. मात्र, सदर कंपनी आता नवीन विकासकाने विकत घेतली असून, काफरी देव देवस्थानचा रस्ता आणि दर्शनास बंदी केली आहे. याबाबत तुर्भे गाव ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रशासन आणि उद्योग मंत्र्यांसोबत पाठपुरावा सुरु ठेवला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी देखील याबाबत पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय यांच्याकडे काफरी देव देवस्थानची पुरातन देवस्थान म्हणून नोंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सहाय्यक संचालक पुरातत्व, रत्नागिरी विभाग यांना पत्र लिहून मंगेश म्हात्रे यांच्या मागणीवर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता काफरी देव देवस्थानची नोंद पुरातन देवस्थान म्हणून कधी होणार याकडे तुर्भे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सी ट्‌वेंटी परिषद'द्वारे सामाजिक संस्थांमध्ये आत्मविश्वासाची पेरणी