काेकणची पाेरं हुशार

 बारावीचा निकाल जाहीर

नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ'तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घ्ोण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला आहे. यंदा देखील बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल ९३.७३ टवव्ोÀ लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत येणाऱ्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला असून या विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
‘मंडळ'तर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ (९१.२५ टवव्ोÀ) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरात ३ हजार १९५ केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली होती. एकूण १५४ विषयांसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी तब्बल २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. मागील वर्षी राज्याचा निकाल ९४.२२ टक्के होता.
विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून तर इतर शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या सहा भाषेतून परीक्षा घ्ोण्यात आली.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४२ टक्के लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रमात ८९.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुर्नपरिक्षार्थी (रिपीटर) निकालाची टक्केवारी ४४.३३ टक्के, खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ टक्के
तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९३.४३ टक्के इतकी लागली आहे.
राज्यात १७ महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल...
धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील १७ महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी पास झालेला नाही. या महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना प्रादुर्भावाअगोदर निकाल ९०.६६ टक्के...
यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घ्ोण्यात आल्या होत्या. यापूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते. कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घ्ोण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिपटमध्ये घ्ोण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घ्ोताना कोणतीही सवलत विद्यार्थ्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी-मार्च मध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल ०.५९ ने अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावाअगोदर राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला होता.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असतील तर त्यासाठी २६ मे ते ५ जून पर्यंत बोर्डाकडून मुदत देण्यात आली आहे. तर गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद - राज्यपाल रमेश बैस