यापुढे बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई

बेलापूर मधील ५८ अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई

तुर्भे ः बेलापूर मधील ५८ अनधिकृत झोपड्यावर नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग कार्यालय तर्फे तोडक कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विरोधी विभाग) सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी सदर कारवाई केली.

बेलापूर सेक्टर-२९ मधील पंचशील नगर मध्ये अनधिकृत झोपड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देखील केली होती. मात्र, तत्कालीन उपायुक्तांच्या काळात या बेकायदा झोपड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. या झोपड्यांना अनधिकृत लाईट, पाणी देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. परिणामी बेकायदा झोपड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. दरम्यान, नवीन महापालिका उपायुक्त यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घ्ोत त्वरित बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या सहाय्याने बेलापूर मधील अनधिवृÀत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापुढे नवी मुंबई शहरात चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली. यामुळे अनधिकृत बांधकामधारक आणि गावठाण भागात ५०-५० तत्वावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रश्नपत्रिकाही हॅक करण्याचा होता प्रयत्न -पोलीस आयुवत भारंबे