सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण

नवी मुंबईकरांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजचे स्वप्न दृष्टीपथात

नवी मुंबई ः सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी सुपरस्पेशालिटी तसेच होतकरु तरुण-तरुणींना डॉवटर होण्यासाठी आवश्यक मेडीकल कॉलेजची उभारणी होण्यासाठी शासन, सिडको आणि नवी मुंबई महापालिका दरबारी सातत्याने पाठपुरावा, पत्रव्यवहार करणाऱ्या ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वप्रथम ‘सिडको'च्या माध्यमातून महापालिकेला भूखंड मिळवून देण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी २३ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात सदर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण केले. याप्रसंगी महापालिकेचे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजची वास्तू ८.४० एकर क्षेत्रफळामध्ये (तळमजला अधिक ९ मजले) उभारला जाणार असून त्यासाठी अंदाजे ८१९.३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. व्ॉÀन्सर, हृदय, मेंदशी संबंधित अनेक मोठ-मोठ्या आजारांवर  सेवा दिली जाणार आहे. यामध्ये जे काही आजार असेल त्या उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे. तसेच सदर हॉस्पिटल मधील रुग्ण क्षमता ५०० बेडस्‌ हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णतः सर्व सुविधायुक्त बनणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

 तसेच सदर प्रकल्पामध्ये पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. या उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजवर नियंत्रण पूर्णपणे नवी मुंबई महापालिकेचे असणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

दरम्यान, सदर प्रकल्प लवकरात लवकर नवी मुंबईकरांसाठी उभारला जाईल. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरात लवकर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे १५ कि.मी.ने कमी; इंधन, वाहतूक खर्च, वेळेची बचत