राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती जाहीर

नवी मुंबईतील सात पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती

नवी मुंबई : राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलिस उप अधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त (निशस्त्र) या पदावर पदोन्नती देत मंगळवारी त्यांची यादी जाहीर केली आहे. यात नवी मुंबई पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱयांची मुंबई व रायगड पोलीस दलात पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. या बदल्याप्रमाणेच गृह विभागाने नवी मुंबई पोलीस दलातील 2 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुंबई पोलीस दलात सर्वसाधारण बदली केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलातील 4 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 143 पोलिस निरीक्षकांची पोलिस उप अधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त (निशस्त्र) या पदावर पदोन्नती जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने आणि पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीने पोलिस अधिकाऱयांना सेवाज्येष्ठतेने हि पदोन्नती देण्यात आल्याचे गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यात पदोन्नतीच्या कोटÎातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत मान्यता देण्यात येत असल्याचेही राज्याच्या गृह विभागाने आपल्या आदेश स्पष्ट केले आहे.

यामध्ये नवी मुंबई पोलीस दलातील खारघर वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत साहेबराव मोहिते तसेच सागरी सुरक्षा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत रवणसिद्ध धरणे व महाराष्ट्र दहशतवातविरोधी पथक नवी मुंबई युनिटचे (एटीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ या चौघांची पदोन्नतीने मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारीपदी तसेच नवी मुंबई वाहतुक प्रशासन शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश रामचंद्र चव्हाण यांची मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तसेच पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस उप अधिक्षक संदीप वसंत भागडीकर यांची सुध्दा मुंबईच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.

तसेच नवी मुंबई कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे वाचक पोलिस उप अधिक्षक शिवाजी ज्ञानदेव पडतरे यांची पेण विभागीय पोलिस अधिकारीपदी, तसेच पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले नवी मुंबईतील पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीजनाथ तिदार व रत्नागिरी येथील पोलीस निरीक्षक विनितकुमार जयवंत चौधरी या दोघांची नवी मुंबईत पोलीस उपअधिक्षक डायल 112 येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीने सहाय्यक पोलीस आयुक्त झालेल्या अधिकाऱयांचे सहकाऱयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या
नवी मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त तसेच पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त गिरीश अर्जुन ठाकरे या दोघांची मुंबई पोलीस दलात सर्वसाधारण बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल सुखदेवराव बोंडे, धर्मपाल मोहन बनसोडे, पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले विशाल वसंत नेहूल यांची नवी मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर देवराम उतळे यांची नवी मुंबईत पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागात बदली करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धोकादायक इमारती, घरांचा रहिवास आणि वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश