पाणथळ क्षेत्रांवर क्राँकीटच्या जंगलांसाठी परवानगी देऊ नये

जैवविविधता दिनाचा आदर करा, पाणजे पाणथळ क्षेत्राचे जतन करा

नवी मुंबई ः पाणथळ क्षेत्राला क्राँक्रीटच्या जंगलांमध्ये रुपांतरीत करुन समृध्द जैवविविधतेला नष्ट करण्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने पर्यावरणवाद्यांनी अभियान सुरु केले आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि सागरशक्ती एनजीओ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवून, त्यात पर्यावरणाला जतन करण्याबाबत त्यांच्या वचनांची पुन्हा आठवण करुन दिली. ‘सिडको'ने ‘नवी मुंबई सेझ'ला चुकीच्या प्रकारे २८९ हेक्टर लांबीचा पाणथळ प्रदेश भाडेतत्वावर दिला आहे. त्यामुळे ‘नवी मुंबई सेझ'ला जागा रिकामी करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. अगदी एका मोठ्या कार्पोरेट हाऊसने नियोजन केलेला आयटी हब पाणजे जैवविविधतेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरता कामा नये. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री
सोसायटी'च्या (बीएनएचएस) अहवालानुसार पाणजे पाणथळ क्षेत्र अनेक पक्षांना आकर्षित करणारे स्थळ आहे.

पाणजे जैवविविधता उद्यान निर्मितीसाठी आदर्श स्थळ आहे. शासनाने ‘सिडको'ला आंतरभरती प्रवाहामध्ये कोणताही अडथळा न आणण्याची सक्त ताकीद द्यावी, असे ‘सागरशवती'चे नंदकुमार पवार यांनी सांगितले.
वास्तवामध्ये स्थानिक नागरिक मैदानाची मागणी करत आहेत. ते कमी भरतीच्या वेळी शुष्क झालेल्या लहानशा भागाचा खेळण्यासाठी उपयोग करतात. या लहानशा भूभागाला मुख्य पाणथळ क्षेत्रापासून एका बांधाद्वारे वेगळे करुन त्याचा मैदानासाठी उपयोग करता येऊ शकतो अशी बाब निदर्शनास आणतानाच त्यामुळे स्थलांतरीत पक्षांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे नंदकुमार पवार म्हणाले.

दरवर्षी २२ मे रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची ‘करारापासून कृती पर्यंतः जैवविविधता पुन्हा निर्माण करा (इीदस् ींुीाासहू ूद ींम्ूग्दहः ँल्ग्त्‌ ँीम्व् ँग्द्‌ग्नीेग्ूब्)' अशी संकल्पना आहे. गेल्या पाच वर्षांपासून नवी मुंबई सेझ सुरक्षेद्वारे प्रोत्साहन मिळालेल्या काही दुराग्रहींनी भरतीच्या पाण्यावर अडथळा घातल्यामुळे पाणजे क्षेत्राचे नुकसान होत आहे. याच्या परिणामास्तव आधी अंदाजे २.५ लाखांच्या घरात असलेली स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या आता झपाट्याने घटली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेला ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड' पुरस्कार प्रदान