नवी मुंबईतील भावे नाट्य गृहात मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत कलाकारांनी  केले समाधान व्यक्त

वाशीतील भावे नाट्यगृह सर्वोत्तम नाट्यगृह

नवी मुंबई -: एकीकडे नाट्यगृहात  मिळणाऱ्या अपुऱ्या सेवांबद्दल नाट्य कलाकार नाराजी व्यक्त करत असतात.मात्र दुसरी कडे नवी मुंबईतील भावे नाट्य गृहात मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत नाट्य कलाकारांनी 

समाधान.व्यक्त करत सोशल मीडियावर स्तुती केली आहे

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी 'चारचौघी' या नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी  नाट्यगृहातील स्वच्छता, रंगभूषा कक्ष, वातानुकूलित यंत्रणा ते अगदी डासविरहित पिटापर्यंत विविध सुविधांचा आढावा घेत 'अप्रतिम नाट्यगृह' अशा शब्दात कौतुक केले.  मुक्ता बर्वे यांच्यासह ज्येष्ठ  अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, कादंबरी कदम, श्रेयस राजे तसेच सहकारी तंत्रज्ञ यांनी या नाट्यगृहाची इतर नाट्यगृहांनी प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.

  नवी मुंबईत नाटकांसाठी प्रेक्षक वर्ग आहेच शिवाय त्यांची नायकविषयी असेलली आस्था ही आहे. परंतु याठिकाणी नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी, प्रेक्षक येण्याआधी स्वच्छता केली जात आहे.  एवढ्या निगुतीने स्वच्छता  करण्यात येत असून  नाट्यगृह खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे. एवढ्या स्वच्छ ठिकाणी अत्यंत आस्थेने प्रेक्षक आणि नाटकाची आणि कलाकृतीची वाट बघितली जाते, आशा ठिकाणी काम करायला खूप हुरूप येतो असे मत अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केले. इतर नाट्यगृहाच्या तुलनेत हे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह अत्यंत स्वच्छ ठेवल्याने याठिकाणी डासांचा त्रास नाही.  परंतु  इतर नाट्यगृहात वातानुकूलित व्यवस्था सुरू नसते, स्वच्छता नसते, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव असतो, मत व्यक्त केले. रंगभूषा कक्षामध्ये टीव्हीची व्यवस्था आहे. त्यामुळे पडद्यावर काय चालले आहे हे बॅक स्टेजला समजते आणि ते नियोजन करण्यासाठी खूप उपयोगी पडते. ज्याप्रमाणे नवी मुंबई शहर सुनियोजित पणे वसलेले आहे, त्याचप्रमाणे नाट्यगृहाची देखील देखभाल ठेवली जात आहे.  इतर नाट्यगृहात कलाकार यांच्या स्वच्छता गृहांची हवी तशी  व्यवस्था नाही. कलाकार मंडळींना व्हीआयपी रूम मध्ये जावे लागते. वाशी नाट्यगृहात मात्र तसे नाही , स्वच्छ आणि नीटनेटके असलेले स्वच्छता गृह आहेत. असे मत अभिनेत्री कादंबरी कदम यांनी व्यक्त केले. वाशी नाट्यगृह नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सुरू आहे.  या नाट्यगृहात देखील नाटकांव्यतिरिक्त विविध संस्कृती, स्नेहसंमेलन, इत्यादी कार्यक्रम होतात. मात्र तरी देखील या नाट्यगृहाची व्यवस्था , उपलब्ध असलेली सोयीसुविधा सुस्थितीत आहेत.  इतर नाट्यगृहांनी देखील याची प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत अस मत कलाकारांमधून व्यक्त होत आहे.  नाटक बघणे हा एक आनंददायी अनुभव असावा. त्यामुळे वाशीतील वातानुकूलित नाट्यगृहात कलाकारांना तसेच प्रेक्षकांना देखील नाटकाचे प्रयोग बघताना आनंददायी अनुभव मिळत आहे. या वाशीतील सोयीसुविधायुक्त विष्णुदास भावे  नाट्यगृहाचे विशेष कौतुक करावेसे वाटते असे मत ज्येष्ठ  अभिनेत्री. रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चाचण्या पूर्ण केल्या मात्र, उरण रेल्वे प्रत्यक्षात धावायला किती वेळ लागेल ?