तद्‌नंतर मृत साठ्यातून पाणी पुरवठा; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

रानसई धरण आटले

उरण ः उरण तालुक्यातील ‘एमआयडीसी'चे रानसई धरण आटले असून फक्त ५ जून पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रानसई धरणाची पाण्याची पातळी संध्या अत्यंत खालावली असून धरणात फक्त ९१.०८ फुट एवढेच पाणी शिल्लक आहे. ते पाणी संपल्यानंतर उरणकरांना मृत (राखीव) साठ्यातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. या मृत साठ्यातील पाणी आणखी १५ दिवस पुरु शकते. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी कडून करण्यात येत आहे.

 उरण तालुक्याला रोज ३५ एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी ३ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते तर रोज ५ एमएलडी पाणी सिडको कडून विकत घ्ोऊन उरणकरांची गरज भागवली जाते. उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी १९७० च्या दशकात सदर धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत धरण बांधले आहे. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात रानसई धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही तर रानसई धरणातील सर्व पाणी संपणार आहे आणि पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे पाण्याची उणीव भरुन कशी काढणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.

रानसई धरणातून उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएजीसी, बीपीसीएल सारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याने येथे येणाऱ्या प्रकल्पांना या धरणातूनच पाणी पुरवठा केला जात आहे. या धरणातून दररोज सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.

‘सिडको'कडून १० एमएलडी पाण्याची मागणी केली होती. मात्र, सिडको सध्या रोज ५ एमएलडी पाणी देत असून उरणच्या लोकांची गरज भागविण्यासाठी पाणी पुरेसे असून रानसई धरण आणि ‘सिडको'चे पाणी मिश्र करुन उरणकरांना देण्यात येत आहे. साधारण २० जून पर्यंत पुरेल एवढेच पाणी रानसई धरणात शिल्लक आहे. त्यामुळे ‘सिडको'ने आणखी ५ एमएलडी पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. उरणच्या नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-वि्ील पाचपुंड, प्रभारी उपअभियंता-एमआयडीसी, उरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील भावे नाट्य गृहात मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत कलाकारांनी  केले समाधान व्यक्त