बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सात नोडमध्ये सभा मोठ्या उत्साहात पार

 

सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गटाचा पर्दाफाश शिवसेना घराघरात पोहोचविणार

नवी मुंबई ः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे आणि शिंदे गटावर ओढलेले ताशेरे घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई तर्फे
घ्ोण्यात आलेल्या सभांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सात नोडमध्ये या सभा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यानंतर जिल्हाप्रमुख वि्ील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना
पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी, न्यायालयाने शिंदे गटाचा पर्दाफाश केल्याची पत्रके घरोघरी जाऊन वाटण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाचे ओढलेले ताशेरे पाहिल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये शिंदे गट आणि भाजप विरोधात
संतापाची लाट उसळली आहे.

‘भाजपा'च्या खुनशी राजकारणामुळे देशातील लोकशाही धोक्यात  आली आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटावर ओढलेले ताशेरे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहेत. त्यासाठी
‘शिवसेना'च्या वतीने विशेष अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी-बेलापूर, सीवुडस्‌, नेरुळ, सानपाडा, तुर्भे आणि
वाशी या ठिकाणी सभा झाल्या. या सभांना महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, दिलीप घोडेकर, मिलिंद सुर्यराव, संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, संदीप पाटील, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख सोमनाथ वास्कर, सुमित्र कडू, मनोज इसवे, उपजिल्हा संघटक निशा पवार, भारती कोळी, विभागप्रमुख समीर बागवान, आदि उपस्थित होते. सर्वच ठिकाणी झालेल्या सभांना शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी मोठी गर्दी केली होती.

सभेनंतर लगेच शिंदे गटाचे वस्त्रहरण करणारे सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे आणि निरीक्षणे घरोघरी पोहोचवण्याची मोहीम सुरु करण्यात आली. खुनशी सत्ताधारी तडीपार होणार... शिवसेना आणि ‘महाविकास आघाडी'च्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेले शिंदे सरकार अनधिकृत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उघड झाले आहे. दडपशाही करण्यासाठी सत्ताधारी खुनशी आणि सुडाचे राजकारण करीत असले तरी ते जास्त काळ चालणार नाही. आगामी निवडणुकीत या खुनशी सत्ताधाऱ्यांना जनता सत्तेतून तडीपार करणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तद्‌नंतर मृत साठ्यातून पाणी पुरवठा; पाणी जपून वापरण्याचे आवाहन