अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनात घट

एपीएमसी फळ बाजारात जुन्नर हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये कोकणी हापूस आंब्याचा हंगाम संपत असताना जुन्नर हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. एपीएमसी फळ बाजारात सध्या १ हजार ते १५०० बॉक्स जुन्नर हापूस आंबा आवक होत असून, दोन ते अडीच डझनला ८०० ते १५०० रुपये दर आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाचा जुन्नर हापूस आंब्याला फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे.

यावर्षी एपीएमसी फळ बाजारात कोकणचा हापूस आंबा अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे मुख्य हंगामात दाखल न होता आधीच एकदम दाखल झाला. त्यामुळे हापूस आंब्याच्या ऐन हंगामात एप्रिल-मे मध्ये हापूस आवक रोडावली. तर जुन्नर हापूस आंबा दरवर्षी एपीएमसी फळ बाजारात मे अखेरपर्यंत येत असतो. सध्या एपीएमसी फळ बाजारात जुन्नर हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर हापूस आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसल्याने यंदा केवळ ४० टक्वे उत्पादन असणार आहे. त्यामुळे जुन्नर हापूस आंबा हंगाम १५ जूनपर्यंत महिनाभर सुरु राहील, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले. एपीएमसी बाजारात सध्या १ हजार ते १५०० बॉक्स जुन्नर हापूस आंबा आवक झाली असून, दोन ते अडीच डझनचा दर ८०० ते १५०० रुपये आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कांदळवनात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे एकूण १११ ठिकाणे निश्चित