शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
वडघर व करंजाडे येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त !
सिडकोच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
नवी मुंबई : सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी वडघर आणि करंजाडे येथील दोन भूखंडावरील अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई करून सदर बांधकामे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
सिडकोच्या दक्षता विभागासोबत अतिक्रमण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरेश मेगडे यांनी सिडकोच्या जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागाने वडघर व करंजाडे नोड येथे विशेष अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली. या मोहिमेत वडघर येथील सर्वे नंबर १/३, १/५ वर उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम तसेच करंजाडे येथील सेक्टर- २ व R४ येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन सिडकोची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्याने त्याविरोधात कारवाई करण्यात आली असल्याचे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेगडे यांनी सांगितले.
सदरची मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी, सिडको पोलीस पथक सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी १ जेसीबी, १ पोकलेन, १ जीप, १० कामगार वापरण्यात आले.