शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
महापालिका कडून ऐरोली विभागात टेम्पो भरुन कापलेले केबल जप्त
विनापरवाना केबल-इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या केबल्स कापण्यास सुरुवात
नवी मुंबई ः नवी मुंबई शहरात केबल आणि इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी शहरभरामध्ये विद्युत खांबावरुन वाट्टेल तशा पध्दतीने आपले केबल टाकल्यामुळे शहरात बेशिस्त केबलचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्ती खांब पडण्याचे तसेच खांबावरील ब्रेकेट आणि फिटींगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे अनेकदा दुर्घटना देखील घडल्या आहेत. केबलचे सदर जाळे शहर सौंदर्यीकरणात बाधा येत असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाने असे बेशिस्तपणे आणि विनापरवानगी टाकण्यात आलेले केबल्स कापून ते जप्त करण्यास सुरुवात केली आहे. १६ मे पासून महापालिकेच्या विद्युत विभागाने नवी मुंबई मधील विविध भागातील केबलचे जाळे कापून ते जप्त केले आहेत.
‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये नवी मुंबई महापालिका नेहमीच राज्यात अग्रभागी राहिली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२' मध्ये राज्यात प्रथम आणि देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेने प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे ‘कचरामुक्त शहर'च्या श्रेणीत नवी मुंबईने फाईव्ह स्टार रँकींग प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ श्रेणीत सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन नवी मुंबईने प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे सदर मानांकने प्राप्त करणारे नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर आहे.
शहराचे सौंदर्यीकरण करताना केवळ काही चौक आणि मुख्य जागा यापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहरात सुशोभिकरणाचे व्यापकत्व प्रदर्शित व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेने शहर सुशोभिकरणावर लक्षणीय भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने आता शहराच्या सुशोभिकरणास बाधा ठरणाऱ्या टिव्ही केबल आणि इंटरनेटच्या केबलचे अनधिकृत जाळे काढण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबावरुन विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील दिवाबत्ती खांब पडण्याचे तसेच खांबावरील ब्रेकेट आणि फिटींगची दिशा बदलण्याचे प्रकार घडून अनेकदा दुर्घटना देखील घडल्या आहेत.
त्यामुळे शहरातील विद्युत खांबांवर, इमारतींवर आणि झाडांवर अनधिकृतपणे तसेच बेशिस्तपणे टाकण्यात आलेले टिव्ही केबल आणि इंटरनेटचे केबल्स स्वतःहुन काढुन टाकण्यासाठी टिव्ही केबल चालक आणि इंटरनेट केबल पुरविणाऱया एजन्सींना महापालिकेच्या वतीने १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, टिव्ही केबल चालक आणि इंटरनेट केबल पुरविणाऱ्या एजन्सींकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अखेर १६ मे रोजी महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरात अनधिकृतपणे टाकण्यात आलेले टिव्ही केबल आणि इंटरनेट केबलचे जाळे तसेच ‘महावितरण'च्या केबल कापण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत ऐरोली विभागामध्ये महापालिका उपअभियंता संजीव पाटील आणि तानाजी शिंदे यांच्या देखरेखीखाली केबल्स कापून काढण्यात आले. या कारवाईत एक टेम्पो भरुन केबल जप्त करण्यात आले.
संपूर्ण नवी मुंबई शहरातील विद्युत खांबांवर, इमारतींवर चौकामध्ये विनापरवानगी टिव्ही केबल, इंटरनेट केबल, त्याचप्रमाणे टेलिफोन केबल आणि ‘महावितरण'चे केबल बेशिस्तपणे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे विद्युत खांबांना अनधिकृत केबलचा विळखा पडला आहे. शहर सौंदर्यीकरणात देखील सदर केबल्स बाधा आणत असल्याने बेशिस्त केबलचे जाळे काढण्यास नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाने पुढाकार घेतला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबांवरुन विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकण्यात आल्याने शहरातील दिवाबत्ती खांब पडण्याचे तसेच खांबावरील ब्रेकेट आणि फिटींगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेकदा दुर्घटना देखील घडल्या आहेत. त्याचप्रमाणे सदर केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणालाही मोठ्या प्रमाणावर बाधा पोहोचत आहे. सर्व केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर यांना सदर केबल काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर देखील केबल्स न काढल्यास महापालिका कडून ते केबल्स काढण्यात येतील. - शिरीष आरदवाड, अतिरवत शहर अभियंता (विद्युत), नवी मुंबई महापालिका.