महापालिका मुख्यालयात रंग काम करणारे कामगार सुरक्षा साहित्याविना

सुरक्षा साधनाविना सदर कामगार काम करत आहेत

तुर्भे : ‘दिव्याखाली अंधार' या म्हणीचा प्रत्येय नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये आला आहे. महापालिकेच्या सीबीडी सेवटर-१५ए येथील मुख्यालयात रंग देण्याचे काम चालू आहे. मात्र, सदर रंगकाम करणारे कामगार सुरक्षा साहित्याविना काम करत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबई शहरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असल्याने नवी मुंबई शहरात सर्वत्र रंगरंगोटी करण्यात आली आहे. या कामासाठी प्रत्येक महापालिका विभाग कार्यालय क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय सीबीडी-पामबीच मार्गावरील महापालिकेच्या मुख्यालयातही रंगकाम करण्यात येत आहे. यासाठी खुले अँपीथिएटर येथे बांबूच्या परांची तळ मजला ते तिसरा मजला पर्यंत बांधण्यात आल्या आहेत. या परांचीवर चढून रंगकाम करणारे कामगार काम करत आहेत. विशेष म्हणजे यातील काही कामगारांच्या पायात साधी चप्पलही नाही. तसेच सुरक्षा हेल्मेट, गमबुट, हातमौजेही या कामगारांनी घातले नव्हते. एकूणच कोणत्याही सुरक्षा साधनाविना सदर कामगार काम करत आहेत. विशेष म्हणजे प्रशासक असलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह महापालिका शहर अभियंता विभागातील सर्व अधिकारी मुख्यालयात प्रतिदिन उपस्थित असतानाही सदर घटना कोणाच्याही लक्षात येऊ नये याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारफुटी कत्तलीची तपासणी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्यावरण विभागाला निर्देश