शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
लिनेस वलबने केले मातांना मोलाचे सहकार्य
मातृदिनी महापालिका इस्पितळात मातांना उपयुवत चीजवस्तूंचा लाभ
नवी मुंबई ः ऑल इंडिया लिनेस क्लब, लिनेस डिस्ट्रिक्ट श्प् १ मुंबई प्रगती २०२३, लिनेस क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशी क्लब आणि सत्संग संस्था यांच्या संयुवत विद्यमाने मातृदिनाचे औचित्य साधून १३ मे रोजी वाशी सेवटर १० मधील नवी मुंबई महापालिका इस्पितळात नुकताच बाळांना जन्म दिलेल्या ७५ मातांना प्रवासाच्या बॅगा, बाळासाठी कपडे, टॉवेल, खजूर, साबण, तेल, कंगवे, लाडू इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिनेस मेरी जॉन, अँडव्हायझर लिनेस छाया कारेकर, क्लब प्रेसिडेंट लिनेस मीना दरवेश, माजी क्लब प्रेसिडेंट लिनेस स्मिता वाजेकर, लिनेसच्या ज्येष्ठ सभासद श्रीमती संतनम, लिनेस अंजली पाटील, सुमन सिंगला, वर्षा चोरे, लिनेस नारायणी अय्यर आदि सर्व महिलांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.