‘पनवेल हॉकर्स फेडरेशन'तर्फे महापालिका आयुवतांना निवेदन

फेरीवाला शहर विक्रीय समिती निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

नवीन पनवेल ः फेरीवाला शहर विक्रीय समितीचे निवडणूक अपुऱ्या वेळेअभावी पुढे ढकलण्याची मागणी ‘पनवेल हॉकर्स फेडरेशन'ने महापालिका आयुक्त गणेश
देशमुख यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या गैरसोयीमुळे सदर फेरीवाला शहर विक्रीय समिती निवडणूक प्रक्रियेच्या काही अर्धवट बाबी असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्ोतला आहे. यासाठी निवडणूक प्रक्रिया करुन निवडून
आलेली शहर पथ विक्रेता समिती स्थापन करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करण्यात येत असल्याचे समजते. मात्र, तुर्तास महापालिकेच्या गैरसोयीमुळे या फेरीवाला शहर विक्रीय समिती निवडणूक प्रक्रियेच्या काही अर्धवट बाबी लक्षात आणून देण्यासाठी ‘पनवेल हॉकर्स फेडरेशन'तर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात २०१९ नंतरचा पहिल्या टप्प्यातील पनवेल महापालिका विभागातील पथविक्रेत्यांचा बायोमॅट्रिक सर्वे आणि विक्रिय प्रमाणपत्र अजुनही बऱ्याच पथ
विक्रेत्यांना अद्याप मिळालेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील पनवेल महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचा बायोमॅट्रिक सर्वे आणि विक्रिय प्रमाणपत्र याची प्रक्रिया अजून महापालिकेने सुरु केलेली नाही.

सदर दोन्ही बाबींच्या अनुषंगाने प्रशासनाने अर्धवट सर्वे आणि विक्रिय प्रमाणपत्र वाटप करुन अपूर्ण मतदान यादी बनवलेली आहे. त्यामुळे सदर मतदार
यादी पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन साईट वर तसेच वर्तमानपत्रात सर्वप्रथम जाहीर करावी. तसेच जी शहर विक्रिय समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पथ
विक्रेत्यांसाठी प्रशासन राबवत आहे, त्याचा प्रचार-प्रसार महापालिकेने केला नसल्यामुळे याबद्दल सर्व मार्केटमध्ये सर्वप्रथम जनजागृती करावी.

जेणेकरुन सर्व पथ विक्रेत्यांना या निवडणुकीची माहिती मिळेल. पहिल्या टप्प्यातील स्थानिक मार्केटच्या पथविक्रेत्यांचा बायोमॅट्रिक सर्वे झाला आहे. तसेच त्यांनी प्रशासनाने सुनिश्चित केलेली सर्व कागदपत्रे जमा केलेली असून अद्याप त्यांना विक्रिय प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे सदर सर्व समस्यांचे निवारण करावे आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया
सर्वांना विश्वासात घ्ोऊन करावी. अन्यथा  हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ‘पनवेल हॉकर्स फेडरेशन'च्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनामध्ये कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, दया गोवारी (कामोठे मार्केट), जयंत भगत (खांदा कॉलनी मार्केट), विनिता बाळेकुंद्री (महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन), किर्तीकांत रावत (कळंबोली मार्केट), मंगेश गोवारी (कामोठे मार्केट), बी. एस.लोंढे  (खारघर मार्केट), रमाकांत गोवारी (संघटना प्रमुख), विद्या रामुगडे (कामगार एकता युनियन), शारदा देसाई
(पनवेल मार्केट), राजेश म्हात्रे  (कामोठे मार्केट), राजेश भगत (नौपाडा मार्केट), बाबुराव भगत (कामोठे मार्केट), संजय ननावरे (नवीन पनवेल मार्केट), आदिंच्या सह्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलसंपन्न नवी मुंबई शहरामधील खेदजनक प्रकार