४५ महिला आणि पुरुष पत्रकारांची आरोग्य चाचणी

जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन तर्फे पत्रकारांची आरोग्य तपासणी

नवी मुंबईः ‘जागतिक रेडक्रॉस दिन'चे औचित्य साधून बेलापूर सेक्टर-१५ए मधील नवी मुंबई महापालिका मुख्यालय मध्ये  जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई या संघटना तर्फे नवी मुंबईतील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घणसोली येथील ‘फ्रीझॉन हॉस्पिटल'चे संचालक डॉ. सुशांत आंधळे यांच्या सहकार्याने नुकतेच आयोजित करण्यात आले होते.  

या शिबिराचे उद्‌घाटन नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, डॉ.रत्नमाला चव्हाण, फिजिशियन डॉ. सुशांत आंधळे, हृदयरोग तज्ज्ञ तमिरुद्दिन दानवडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्चना क्षीरसागर, डॉ.विक्रम आंधळे, ‘जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष अशोक शेशवरे, सरचिटणीस नागमनी पांडे, नवी मुंबई महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नियमित आरोग्य तपासणी केल्याने शरीरातील व्याधी तत्काळ कळतात. त्यामुळे ताबडतोब त्या व्याधींवर उपचार करणे शवय होते. परिणामी मनुष्य दुर्धर आजाराला बळी पडत नाही. आरोग्य तपासणी केल्याने प्राथमिक अवस्थेतील आजार वैद्यकीय तज्ञांच्या नजरेस पडतात. परिणामी लाखो रुपयांचा खर्च वाचला जातो. त्यामुळे नियमितपणे आरोग्य तपासणी करणे काळाची गरज आहे, असे मनोगत यावेळी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी व्यवत केले.

या शिबिरात ‘फ्रीझॉन हॉस्पिटल'चे संचालक तथा छाती, फुपफुस आणि क्षयरोग तज्ञ डॉ. सुशांत आंधळे, डॉ. विक्रम आंधळे आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना क्षीरसागर यांनी ४५ महिला आणि पुरुष पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. तमिरुद्दिन दानवडे यांनी उपस्थित सर्वच पत्रकारांची ईसीजी चाचणी केली.

दरवर्षी ५१ हजार रुपये आर्थिक सहाय्य  पत्रकारांच्या वैद्यकीय सेवा सुविधांसाठी दरवर्षी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा या शिबिरात पत्रकारांच्या प्रत्येक मदतीला साथ देणारे बांधकाम व्यावसायिक तथा चित्रपट निर्माते प्रकाश बाविस्कर यांनी केली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त नार्वेकर यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस