डी.वाय.पाटील रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा

 

नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन  उत्साहात साजरा

नवी मुंबई ः नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रुग्णालयातील परिचारिकांसाठी पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘डी. वाय. पाटील ग्रुप'चे अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त सौ. शिवानी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार छत्रपती संभाजी राजे, ‘डी. वाय. पाटील ग्रुप'च्या आरोग्य संचालिका डॉ. आकांक्षा सबरवाल, ‘डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मेडिसीन'चे अधिष्ठाता डॉ. राजीव राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गडकरी, सर्व परिचारिका वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात परिचारिका अधीक्षक सौ. सुरेखा मोढवे, लक्ष्मण आवळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

८० लाखांच्या वैद्यकीय सामुग्रीचे पनवेल महापालिकेकडे विनामुल्य हस्तांतरण