खारघर मधील नागरिक समाधानी 

खारघर मध्ये नालेसफाईची कामे जोरात सुरु

खारघर ः पावसाळा सुरु होण्यापूर्वी पनवेल महापालिकेने ७ जेसीबी आणि ३ पोकलण यांच्या माध्यमातून खारघर मधील नालेसफाईचे काम सुरु केल्यामुळे खारघर मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

पनवेल महापालिका हद्दीत १५ मे २०२३ पूर्वी पावसाळीपूर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुवत गणेश देशमुख यांनी केली आहे. त्यानुसार खारघर मध्ये नालेसफाईची कामे जोरात सुरु आहेत. खारघर सेक्टर-२ मधील लिटिल वर्ल्ड मॉल समोरील नाला, सेक्टर-७, ११, १२ आणि खारघर सेक्टर-२१ मधून सेक्टर-१३ मार्गे कोपरा खाडीत जणारा नाला तसेच खारघर सेक्टर-१९ आणि सेक्टर-३५ कडून सेक्टर-३० मार्गे मुर्बी खाडीकडे जाणारा मोठा नाला आहे. या सर्व नाल्यांमध्ये पानवेली मोठया प्रमाणात वाढली आहे. तसेच झाडे-झुडपे आणि प्लास्टिक कचरा नाल्यात पडून आहे. ओवे आणि खारघर डोंगरावरील पावसाचे पाणी या नाल्यातून खाडीत वाहून जाते. विशेष म्हणजे खारघर सेक्टर-७, ११ आणि सेवटर-१२ मार्गे कोपरा खाडीकडे जाणारा नाला पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो. या सर्व बाबी विचारात घ्ोवून पनवेल महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर मधील नालेसफाईचे काम ७ जेसीबी, ३ पोकलण आणि काही कामगारांच्या मदतीने सुरु आहे.

पावसाळ्या पूर्वी नालेसफाईची कामे पनवेल महापालिकेकडून खारघर मध्ये सुरु करण्यात आली आहेत. नाले सफाई करताना रस्ते आणि पदपथावर मातीचे ढिगारे राहणार नाहीत, याची काळजी महापालिकेने घ्ोण्याची आवश्यकता आहे. - ॲड. नरेश ठाकूर, माजी नगरसेवक - खारघर.

खारघर मध्ये ७ जेसीबी, ३ पोकलण यांच्या माध्यमातून नालेसफाईचे काम सुरु आहे. येत्या १५ मे पूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. - जितेंद्र मढवी, खारघर प्रभाग अधिकारी - पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डी.वाय.पाटील रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा