न्हावा येथे २ हजार कांदळवन नष्ट

 

कांदळवने वन विभागाकडे हस्तांतरीत करण्याकडे ‘सिडको'कडून दुर्लक्ष

नवी मुंबई ः स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींनी न्हावा येथील रामबाग बागेजवळ सिडको नियंत्रित दोन हेक्टर क्षेत्रावरील २ हजार  कांदळवन नष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. न्हावा येथे राहणाऱ्या वैभव म्हात्रे यांनी सदर बाब वन विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ८ मे रोजी घारापुरीचे वनपाल सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार कांदळवन विनाशाचे पुरावे नोंदवले गेले आहेत.

कांदळवनावर कचरा टाकून आंतरप्रवाही पाणी अडवले जाते. असे केल्याने शेकडो कांदळवनातील झाडांना वाढायला वाव मिळत नाही. एक कुशल पलॅप वापरुन प्रवाहाचा ओघ थांबविण्याचे काम केले जाते. परिणामी, त्याद्वारे कांदळवने नष्ट केली जातात. सिडको या क्षेत्राचे नियंत्रण करते म्हणून या प्रकरणी सिडको'ला कारवाई करण्याची आपण विनंती करणार असल्याचे वनपाल सुनील महाडिक यांनी सांगितले.

सदर परिसरात टी.आय.पी.एल या खासगी कंपनीचा काँक्रीट मिक्सर ट्रकही आढळूनआला आहे, असे पुरावे वन विभागाने नोंदविलेले आहेत. सन २००५ चे गुगल मॅप वैभव म्हात्रे यांनी तयार केले होते. यामध्ये रामबाग उद्यानाच्या कमानीच्या दोन्ही बाजुला चांगल्या प्रकारचे कांदळवन असल्याचे दिसून आल्याचे महाडिक पथकाच्या अहवालात म्हटले आहे. पण, दुर्दैवाने आता ती झाडे माती आणि कचऱ्याने दबली गेली आहेत. अशा प्रकारे मैदानाचा विस्तार केला जात आहे, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कांदळवन समितीसमोर ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सदर मुद्दा मांडला. ‘सिडको'ने अजुनही अनेक कांदळवनाची क्षेत्रे संवर्धनासाठी वन विभागाकडे हस्तांतरीत केलेली नाहीत. सदर बाब रामबाग प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिध्द झालेला आहे. सदर न्हावा स्थळाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या समितीने अनेकदा स्मरणपत्रे देऊन सुध्दा एनआरआय येथील मागची, उलवे आणि खारघर येथील कांदळवन जंगले अजुन सुध्दा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

सदर प्रकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्ट उल्लंघन असून त्यावर पाणथळ समितीने कठोर कारवाई करावी.  कांदळवन समितीला सदर जागी केलेला भराव काढून टाकून आंतरप्रवाही ओघ पूर्ववत करण्याचे आदेश देण्याय यावेत. अशाने कांदळवन स्वतःच पुन्हा वाढेल, अशी विनंती बी. एन.कुमार यांनी केली आहे. किमान दोन हेक्टरवर विध्वंस पसरला असून अंगठ्याच्या नियमाप्रमाणे गेलो तर २ हजार अधिक कांदळवनातील झाडे नष्ट झाली आहेत, असे कुमार यांनी सांगितले.

याबाबत नवी मुंबई कांदळवन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांच्याशी ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने संपर्क साधल्यावर त्यांनी ‘सिडको'ला सदर ठिकाणी कांदळवनांची कत्तल कितपत झाली आहे, ते तपासण्यास सांगितले आहे. दरम्यान, ‘सिडको'ने कारवाई केली नसल्याचे वन विभागाच्या ताज्या पाहणी अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे कांदळवनांचा निरंतर विनाश सुरु असल्याची खंत ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'तर्फे कांदळवन समिती समोर व्यवत करण्यात आली. तर कांदळवन नष्ट होणे सामान्य घटना नाही. याबाबत आम्ही तक्रारी देऊन सुध्दा कांदळवनांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रम सुरुच असल्याचे वैभव म्हात्रे म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा तडकाफडकी निर्णय