महापालिका आयुक्तांकडून सीबीडी मधील वाहनतळ कामाची पाहणी

सीबीडी मधील वाहनतळात ४७६ चारचाकी, १२१ दुचाकी पार्कींग सुविधा उपलब्ध

नवी मुंबई ः झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये पार्कींग मोठी अडचण असून यावर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या जातात. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाकर्िंग नियोजनासाठी ‘सिडको'कडे महापालिका मार्फत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. या अनुषंगाने ‘सिडको'मार्फत पार्कींग सुविधेकरिता सीबीडी-बेलापूर विभागात २ आणि वाशी विभागात १ भूखंड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

यापैकी बेलापूर, सेवटर-१५येथील भूखंड क्र.३९ वर बहुमजली वाहनतळ  विकसित करण्यात येत असून या कामाची आयुवत राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत पुढील ३ महिन्यात सदर काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बहुमजली वाहनतळात ४७६ चारचाकी वाहने आणि १२१ दुचाकी वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून सेक्टर-१५ येथील कै. नागा गना पाटील उद्यानासमोरुन पूर्व दिशेला वाहनतळात येण्यासाठी प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे. या वाहनतळातून बाहेर जाण्यासाठी पश्चिम दिशेला प्रवेशद्वार व्यवस्था आहे.

आगामी काळात इलेक्ट्रीकल वाहनांची संख्या वाढणार असून त्यादृष्टीने पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन द्यावी. वाहनतळाच्या लगत ‘महावितरण'चे इलेक्ट्रीकल सबस्टेशन असल्याने त्याचा विचार करुनच इमारतीच्या आराखड्यामध्ये अत्यावश्यक बदल करुन सदर बहुमजली वाहनतळाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कामे नियोजनबध्दरित्या पूर्ण करुन आगामी तीन महिन्यात बहुमजली वाहनतळ कार्यान्वित होईल आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला सूचित केले.

अशाच प्रकारची आणखी एक वाहनतळाची जागा सीबीडी-बेलापूर विभागात उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याठिकाणी सदस्यस्थितीत डांबरीकरण करुन तसेच वाहने उभी करण्यासाठी पट्टे मारुन भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याचे निर्देशही आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिले.

दरम्यान, संपूर्ण नवी मुंबई शहरात पार्कींगचे नियोजन करण्याबाबत नुकतीच वाहतूक पोलीस आणि पोलीस विभागासोबत चर्चात्मक बैठक संपन्न झाली आहे. यावेळी चर्चेअंती ठरल्याप्रमाणे १५ दिवसात विद्यमान पार्कींग स्थितीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभाग आणि सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण कार्यवाही सुरु आहे. सदर सर्वेक्षण जलद पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करण्याबाबत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आदेशित केले आहे.

वाहनतळाच्या पूर्वेकडील बाजुस दर्शनी भागात मोठी भिंत असून त्या भिंतीवर डिजीटल बोर्ड लावून जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य आहे काय? याची सर्व बाजुंनी पडताळणी परवाना विभागाने करावी. या माध्यमातू महापालिकेला उत्पन्न मिळू शकते. याशिवाय वाहनतळावर दर्शनी ठिकाणी पार्कींगच्या सद्यस्थितीतील उपलब्धतेबाबत डिजीटल बोर्डवर माहिती प्रदर्शित करण्यात यावी. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पणन संचालकांच्या बाजूवर संचालक मंडळाचे भवितव्य