लोकप्रतिनिधी नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ‘गॅस लाईन'च्या कामाला सुरुवात

पनवेल अष्टविनायक कॉलनी आणि परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर ‘गॅस लाईन'च्या कामाला सुरुवात

पनवेल ः पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग-१८ मध्ये कार्यकुशल लोकप्रतिनिधी नितीन जयराम पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अष्टविनायक कॉलनी आणि परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे.

 पनवेल महापालिका प्रभाग-१८ मधील अष्टविनायक कॉलनी आणि परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या जोडण्या अद्याप झाल्या नव्हत्या. त्या अनुषंगाने तेथील रहिवाशांनी माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात तक्रार नोंदीत केली होती. याची तातडीने दखल घेत नितीन पाटील यांनी संबंधित पनवेल महापालिका आणि महानगर गॅस कंपनी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार महानगर गॅस लाईन जोडणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनोळखी वाहने त्या ठिकाणी रस्त्यावर पार्क केल्याने अडथळा निर्माण होतो, असे लक्षात येताच नितीन पाटील यांनी पनवेल महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडथळा निर्माण करणारी वाहने बाजूला केली आणि गॅस जोडणीचे काम सुरळीत करुन दिले. त्याबद्दल तेथील रहिवाशांनी माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुक्तांकडून सीबीडी मधील वाहनतळ कामाची पाहणी