नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या एनएमएमटी बस स्थानकातील विविध बांधकामाची आयुवतयांकडून पाहणी

महापालिका आयुवतांकडून वाशी मधील बस स्थानक, तरणतलाव कामाची पाहणी

नवी मुंबई ः कोव्हीड कालावधी तसेच पर्यावरण विभागामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास झालेल्या विलंबामुळे कामात काहीसा विलंब झालेला असेल तरी आता अडचणी दूर झालेल्या आहेत. योग्य प्रकारे कामाचे नियोजन करुन त्यादृष्टीने मनुष्यबळ आणि यंत्रणेमध्ये वाढ करुन विहित मुदतीत गुणवत्ता राखून काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले. वाशी, सेक्टर-१२ येथील भूखंड क्रं.१९६ आणि १९६ए येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या एनएमएमटी बस स्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल आणि ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलाव बांधकामाची आयुवत राजेश नार्वेकर यांनी पाहणी व्ोÀली. याप्रसंगी शहर अभियंता सजंय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संख्ये, सुनिल लाड आणि इतर अभियंते तसेच वास्तुविशारद आणि कंत्राटदार उपस्थित होते.

९२४६.१३ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर ११६५२.९७ बांधकाम क्षेत्रफळात आठ मजली बहुउपयोगी इमारत उभारली जात असून तळमजल्यावर आठ बस थांब्यांचे बस स्थानक, २ बसमार्ग, ४ बसेससचे इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन, १८ चारचाकी वाहनतळ तसेच २ एनएमएमटी कंट्रोल रुम, नागरिकांसाठी फुड कोर्ट आणि स्वच्छतागृह अशी बहुविध व्यवस्था असणार आहे. सदर इमारतीच्या तळमजल्यावर तसेच पहिल्या मजल्यावर ११ शोरूमची व्यवस्था असून वाहनतळही असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर वाहनतळासह फिल्टरेशन प्लांट आणि बॅलेन्सिंग टँकची व्यववस्था असणार आहे. तिसरा मजला नागरिकांच्या विविध क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध करुन दिला जाणार असून त्यामध्ये स्क्वॅश कोर्ट, योगा रुम, स्पोर्टस्‌ हॉल अशा सुविधा असणार आहेत. या मजल्यावरही वाहनतळ सुविधा उपलब्ध आहे. 

चौथ्या मजल्यावर ऑलिंपिक आकाराचा २५ मीटर X ५० मीटर जलतरण तलाव सुविधा असणार असून तो नवी मुंबईतील सर्वात मोठा जलतरण तलाव असणार आहे. याद्वारे नवी मुंबईतील जलतरणपटुंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करता येणार आहे. या मजल्यावर जलतरण तलावाप्रमाणेच कॅफेटेरिया, जीम, मेडिटेशन रुम, कॉश्च्युम रुम, व्हिआयपी लाँज, डेक, शॉवर रुम, चेंजींग रुम यादेखील पूरक सुविधा असणार आहेत. या मजल्यावरही वाहनतळ असणार आहे. पाचव्या मजल्यावर आंतरक्रीडा संकुल रचना, योगा रुम, संमेलन कक्ष, क्रीडा सभागृह तसेच ४५० आसन व्यवस्थेचे स्टेडियम असणार आहे. सहाव्या आणि सातव्या मजल्यावर विविध कार्यालयांसाठी केबीन्स उपलब्ध असणार आहेत. तसेच आठव्या मजल्यावर बेन्क्वेट हॉलची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सदर  सर्व मजल्यांवर अत्याधुनिक स्वरुपाची स्वच्छतागृहे सुविधा असणार आहे. तसेच या अद्ययावत इमारतीमध्ये ३९८ चार चाकी आणि १५५ दुचाकी वाहनतळांची व्यवस्था आहे.

या सर्व बाबींची बारकाईने माहिती घेत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बांधकाम सुरु असताना त्रयस्थ तपासणी संस्था म्हणून काम पाहणाऱ्या ‘आयआयटी'च्या तज्ञ व्यक्तींनी सूचित केलेल्या सूचनांचे पालन करावे. सद्यस्थितीत ४५ टक्क्याहुन अधिक काम झालेले असल्याचे पाहून उर्वरित काम जलद पूर्ण करण्याचे आणि ते करताना गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या नवीन शहर प्रकल्पांतील अकरावे शहर