एका स्पा चालक महिलेला पोलीस कारवाईची भिती दाखवुन तिच्याकडे 15 हजार रुपये प्रती महिना खंडणीची व शरीरसुखाची मागणी

शिव प्रतिष्ठानच्या नावाने स्पा व मसाज पार्लर चालकांना धमकावुन खंडणी उकळणारी दुक्कली गजाआड

नवी मुंबई : स्पा व मसजा पार्लरमध्ये अल्पवयीन मुलींकडुन वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचे धमकावुन वाशी सेक्टर-30 मधील एका स्पा चालक महिलेला पोलीस कारवाईची भिती दाखवुन तिच्याकडे 15 हजार रुपये प्रती महिना खंडणीची व शरीरसुखाची मागणी करणाऱया टोळीतील दोघा तरुणांना वाशी पोलिसांनी खंडणी व विनयभंगाच्या गुह्याखाली अटक केली आहे. पोलिसांनी आता या टोळीतील इतर तरुणांचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यामध्ये गणेश गोपाळ गोवेकर (26) आणि अक्षय यशवंत सोनावणे (27) या दोघांचा तर फरार असलेल्या आरोपींमध्ये ऋतिक केदार व साहील पाटणकर या दोघांचा समावेश आहे. हे सर्वजण कल्याण भागात राहण्यास असून हे सर्वजण बेकार आहेत. या चौकडीने गत 25 एप्रिल रोजी वाशी सेक्टर-30 ए मधील फोनिक्स स्पा चालविणाऱया तरुणीला तिच्या स्पामध्ये अल्पवयीन मुलींकडुन वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे धमकावुन तिला पोलीस कारवाईची भीती दाखविली होती. त्याचप्रमाणे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संस्थेच्या लेटरहेडवर या तरुणीच्या स्पा विरोधात तसेच स्पा व मसाजचा व्यवसाय करणाऱया इतर स्पा चालकाविरोधात पोलिसांकडे खोटा तक्रार अर्ज केला होता.  

काही दिवसानंतर या चौकडीने स्पा चालक तरुणीला आपल्या कारमध्ये बसवून तिच्या स्पावर पोलिसांमार्फत कारावाई करण्याची भिती दाखवून तिच्याकडे 15 हजार रुपये प्रती महिना खंडणीची व शरीरसुखाची मागणी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या स्पा चालक तरुणीने वाशी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाशी पोलिसांनी रविवारी सायंकाळी सापळा लावला होता. यावेळी रात्री 9 च्या सुमारास गणेश गोवेकर आणि अक्षय सोनावण या दोघांनी स्पा चालक तरुणीकडून गुगल पे-द्वारे स्पा चालक तरुणीकडुन 5 हजार रुपये स्विकारले असता, पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात खंडणी, विनयभंग व धमकावणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता इतर दोघा आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यंदाही नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम ?