नवी मुंबईत फलकांवरील जाहिराती स्पष्ट दिसाव्या म्हणून झाडांवर कुऱ्हाड

नवी मुंबईत जाहिरातींआड येणाऱ्या वृक्षांची नाहक कत्तल ?

नवी मुंबई -: नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभे रहात आहेत. मात्र या  फलकांवरील जाहिराती स्पष्ट दिसाव्या म्हणून झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

ग्लोबल वॉर्मिगमुळे आज पृथ्वीवरील तापमानात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सगळीकडे  झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबई शहरात झाडांच्या कत्तलीवर अधिक जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.आधीच विकास कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांची कत्तल होत असताना आता जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल केली जात आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३०, २८ तसेच १९ मध्ये जाहिरात होर्डिंग्सला अडथळा निर्माण होत असल्याने अशाप्रकारे  झाडांची छाटणी केली आहे. जाहिरात परवानगी विभाग आणि उद्यान विभागाचे अधिकारी यांचे यामध्ये सातत्याने हितसंबंध गुंतलेले असल्याने  जाहिरात फलकांच्या आड येणार्‍या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय हानिकारक असल्याची खंत पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदुषणावरील उपाययोजनांसाठी आयआयटी-मुंबई कडून अभ्यास