शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
एपीएमसी संचालक मंडळाचे कोरम अपूर्ण असल्याने बैठका अभावी संपूर्ण निर्णय प्रकिया ठप्प
एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्यास संचालकांचा विरोध
नवी मुंबई -: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी १० सदस्य तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरल्याने केवळ आठ सदस्य शिल्लक आहेत.त्यामुळे संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण सदर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमू नये म्हणून पणन संचालकांनी आठ संचालकांना कारणे दाखवा नोटीस.बजावली आहे.मात्र आता राज्यात बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे यातील बरेच संचालक पात्र तसेच नवीन संचालक बाजार समितीवर येणार असल्याने संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्यात विद्यमान संचालकांनी विरोध केला आहे.
राज्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती, उप सभापती सह १८ पैकी १० संचालक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे संचालक मंडळ कोरम पूर्ण नसल्याने बैठका ठप्प आहेत. तर संचालकांच्या अपात्रेबाबत शासन दरबारी व न्यायालयात सुरु असलेली सुनावणी सुरू असून तारखांवर तारखा पडत आहेत. संचालक मंडळाचे कोरम अपूर्ण असल्याने बैठका अभावी संपूर्ण निर्णय प्रकिया ठप्प आहे. यामुळे १८ पैकी १० संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढत पणन संचालक विनायक कोकरे यांनी मागील महिन्यात संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये? अशी विचारणा विद्यमान आठ संचालकांना केली आहे. तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या संचालकांची संख्येमुळे बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरू करण्यात आली होती.त्यामुळे विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत पणन संचालकांनी ८ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून १८ एप्रिल पर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समितीच्या संबधित घटकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याकरिता गणपूर्तीअभावी तसेच समिती सदस्यांवर सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने आणि त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिक्रमण करणे आवश्यक झाले आहे.या नोटीसिवर संचालकांनी त्यांचा समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला होता. मात्र सदर उत्तर देण्यास पणन संचालकांनी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे असे असताना आता राज्यातील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे तेथील संचालक आता येथील बाजार समितीसाठी पात्र ठरणार आहेत. संचालक पात्र ठरल्यानंतर येथील संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होईल. त्यामुळे पणन खात्याच्या मंजुरी नंतर सभापती आणि उपसभापतीची निवड देखील होणार आहे. त्यामुळे सदर संचालक मंडळ बरखास्त करण्यास येथील संचालकांचा विरोध आहे अशी माहिती एपीएमसी धान्य बाजारचे संचालक नीलेश विरा यांनी दिली.