एनएमएमटीच्या 6 वाहकांचा महाराष्ट्र दिनी सन्मान  

फोन पे व्दारे सर्वाधिक तिकीट वितरण करणा-या एनएमएमटीच्या 6 वाहकांचा महाराष्ट्र दिनी सन्मान

 नवी मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन फोन पे व्दारे एनएमएमटी बसेसमध्ये तिकीट वितरण करून सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार करणाऱया तसेच सर्वाधिक सहामाही ऑनलाईन अर्थव्यवहार करणा-या 6 वाहकांचा महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि भेटवस्तु देऊन विशेष सन्मान करण्यात आला.  

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऍम्फिथिएटरमध्ये संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, शिक्षणाधिकारी अरूणा यादव, मुख्य वाहतुक अधिकारी  अनिल शिंदे, वाहतुक अधिक्षक सुनील साळुंखे, लेखा अधिकारी प्रशांत सकपाळ, कनिष्ठ अभियंता तुषार गरूड, फोन पे चे राष्ट्रीय मुख्य अधिकारी राकेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  
एनएमएमटी बसेसमध्ये जानेवारी 2022 पासून फोन पे व्दारे कॅशलेस प्रणालीचा वापर करुन तिकीट वितरण करण्यास सुरुवात झाली असून जानेवारी 2022 मध्ये 4 हजार इतका असणारा अर्थव्यवहार एक वर्षातच जानेवारी 2023 पर्यंत 16 हजाराहून अधिक झालेला आहे. तसेच फोन पे व्दारे तिकीट वितरणाची रक्कम जानेवारी 2022 मध्ये 26 लाखाहून अधिक होती, ती आता जानेवारी 2023 पर्यंत 1 कोटी 8 लाखाहून अधिक झालेली आहे.  

एनएमएमटीचे वाहक शिवाजी देवकर, राजेंद्र पाटील, मयूर नायकोडी या 3 वाहकांनी फोन पे व्दारे तिकीट वितरण करुन सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार केले. तर वाहक दिपक दराडे, शंकर गवते, दिलीप पवार या 3 एनएमएमटी वाहकांनी सर्वाधिक सहामाही ऑनलाईन अर्थव्यवहार केले आहेत. या 6 वाहकांनी ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर करुन सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार केल्याने त्यांचा 21 हजार रुपयांचा धनादेश तसेच विशेष भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.- आयुक्त राजेश नार्वेकर (नवी मुंबई महानगरपालिका)  

आधुनिकतेची कास धरणा-या व नवे तंत्रज्ञान शिकू पाहणाऱ्या एनएमएमटी वाहकांच्या चांगल्या कामाची दखल फोन पे मार्फत घेण्यात आली असून त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळेलच याशिवाय इतर वाहकांनाही यामधून आणखी चांगले काम करण्याची स्फुर्ती मिळणार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील कॅशलेस सोसायटीच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळापूर्व कामांसाठीची पाळणार डेडलाईन