अनधिकृत बॅनरबाजीमुळे स्वच्छ भारत अभियानात बाधा

स्वच्छ भारत अभियानात अनधिकृत बॅनरबाजीमुळे बाधा

नवी मुंबई -: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराचा प्रथम क्रमांक यावा म्हणून मनपा करोडो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात जनजाृती करत असते. मात्र  या स्वच्छ भारत अभियानात  शहरात झळकणारे अनधिकृत बॅनर बाधा आणत आहे.त्यामुळे स्वच्छ भारत अभियानावर केलेली मेहनत वाया जात आहे.

शहरात  राजकीय  नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस फलक यातून शहराचे विद्रूपीकरणच सुरू आहे. नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली जाहिरातबाजी आता गल्लीबोळांत पोहोचली आहे. दिघा ते घणसोली परिसरात अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींचे पेव फुटले आहे. राजकीय नेत्यांच्या जाहिरातींपासून, डझनभर छायाचित्रांसह माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह विविध इमारतींभोवती दिसतात. जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जात असून यात राजकीय चेहरे आघाडीवर असतात .त्यामुळे  महसूल  तर बुडत आहे  शिवाय शहराचे विद्रूपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. या शहरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, बस थांबे, महत्त्वाची सर्व ठिकाणे अनधिकृत, अधिकृत होर्डिंग्जमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहेत. महापालिकेच्या परवाना विभागाची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात वारंवार कारवाई केली जाते, मात्र  यातील बहुतांश फलक हे राजकीय नेत्यांची असल्याने मनपा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही.मात्र अशा बॅनर मुळे स्वच्छ भारत अभियानात बाधा निर्माण होत आहे.

विद्युत मनोऱ्यावर जाहिरात बाजी

शहरात काही ठिकाणी उच्च दाबाच्या वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.आणि या वीज वाहिन्यांखालील जागा, व  मनोरे संरक्षित केली असून अशा मनोऱ्यांवर विजेचा धोका असल्याबाबत फलक लावण्यात आले आहेत.मात्र असे फलक असून देखील काही जणांनी नेत्यांच्या प्रेमापोटी आपल्या जीवाची पर्वा न करता अशा मनोऱ्यांवर अनधिकृत जाहिरात बाजी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एनएमएमटीच्या 6 वाहकांचा महाराष्ट्र दिनी सन्मान