मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मेट्रो मार्गाची सिडको उभारणी करणार

मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा  

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मानखुर्द पर्यंत येणारी मुंबईची मेट्रो क्रं.-8 आता नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मेट्रो लाईन एकला जोडली जाणार आहे. त्यानंतर हिच मेट्रो लाईन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मेट्रो मार्गाची सिडको उभारणी करणार आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्द दरम्यानच्या 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो क्रं. आठ चे काम एमएमआरडी ने हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द या 11 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गानंतर मानखुर्द ते वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि बेलापूरपर्यंतच्या मेट्रो मार्गाची उभारणी आता सिडको करणार असून शासनाने या मार्गाच्या कामाला हिरवा कंदील दाखवल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.


दरम्यान, मानखुर्द ते बेलापूर पर्यंतची मेट्रो कनेक्टिव्हिटी जोडण्याकरिता डीपीआर बनवण्याचे काम युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट एजन्सी अर्थात (उमटा) या केंद्र सरकारच्या एजन्सीला देण्यात आले आहे. या मेट्रो मार्गाचा डीपीआर उपलब्ध झाल्यानंतरच या मेट्रो मार्गावर होणारा खर्च आणि त्यासाठी लागणारा कालावधी समजू शकणार आहे.  विशेष म्हणजे या मेट्रो मार्गात वाशी खाडी येणार असल्याने खाडीवर मेट्रोसाठी स्वतंत्र पुलाची उभारणी करावी लागणार आहे.  

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रीय ॲटलास सुचीमध्ये ७.५७ लाख पाणथळ क्षेत्रांपैकी फवत १,२४३ पाणथळ क्षेत्रांची नोंद