राष्ट्रीय ॲटलास सुचीमध्ये ७.५७ लाख पाणथळ क्षेत्रांपैकी फवत १,२४३ पाणथळ क्षेत्रांची नोंद

 

सानपाडा मधील मैदान केंद्रीय पाणथळ नकाशावर चिन्हांकित

नवी मुंबई ः केंद्र शासनाच्या अधिकृत पाणथळ क्षेत्र वेबसाईटचा सावळा गोंधळ आणि मन लावून न केलेला कार्यान्वय असे वर्णन करत पर्यावरणवादी समुहांनी पर्यावरण व्यवस्थेच्या संरक्षणाच्या संदर्भात दिलेली वचने आचरणात आणण्याची विनंती केंद्र शासनाला केली आहे. एकूण ७,५७,०४० पाणथळ क्षेत्रांपैकी निव्वळ १,२४३ पाणथळ क्षेत्रे
राष्ट्रीय पाणथळ क्षेत्र ॲटलास नुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाच्या (एमओइएफसीसी) अधिकृत वेबसाइटवर जोडली गेली असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सांगितले आहे. या साईटच्या तपशिलानुसार २,००,२०५ पाणथळ क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्र २.२५ हेक्टर्सपेक्षा मोठे आहे.

नवी मुंबईमधील सानपाडा येथील मैदान इतर पाणथळ क्षेत्रांचा भाग तर शिवडी जवळ अरबी समुद्राच्या ठळक परिसराला महत्वपूर्ण पाणथळ क्षेत्र असे गणण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे नवी मुंबईतील इतर कोणत्याही पाणथळ क्षेत्राला सदर नकाशावर स्थान दिले गेले नसल्याची बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

बी. एन. कुमार यांनी आरटीआय अधिनियमांच्या अंतर्गत मागणी केली होती. त्यानुसार दिलेल्या निवेदनामध्ये देशभरातील ओळख केलेल्या आणि दखल घेतलेल्या पाणथळ क्षेत्रांच्या सुचीची विचारणा करण्यात आली. त्याअनुषंगाने एमओइएफसीसीने कुमार यांना इंडियन वेटलँडस्‌ पोर्टल (भारतीय पाणथळ क्षेत्र पोर्टल) कडे निर्देशित केले आहे. त्यामुळे कुमार यांनी मंत्रालयाकडे पुन्हा संपर्क साधत स्पष्टता नसणे आणि तपशीलाबद्दल विचारणा करण्याबाबतचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.


पाणथळ क्षेत्रांच्या स्थितीबद्दल कोणतीही स्पष्टता नसणे आणि राष्ट्रीय ॲटलासचे योग्यप्रकारे आकलन न होण्याच्या परिस्थितीमध्ये सर्व महत्वपूर्ण पाणथळ क्षेत्रांचा विकासाच्या पडद्याआड ऱ्हास होत आहे. याबद्दल कुणालाही कसलीही पर्वा नाही. वेबसाईटवर जोडल्या गेलेल्या १,२४३ पाणथळ क्षेत्रांपैकी ७५ ठिकाणांना रामसर क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. एकंदरीत ११५ स्थळांना महत्वपूर्ण पाणथळ क्षेत्रे तर १,०५३ स्थळांचे इतर पाणथळ क्षेत्रे अशाप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या पोर्टलमध्ये महत्वपूर्ण व इतर पाणथळ क्षेत्रे परिभाषित झालेली नाहीत. त्याचप्रमाणे त्यामध्ये राष्ट्रीय पाणथळ क्षेत्र ॲटलास बद्दल अधिक तपशील दिला गेलेला नाही. सदर बाब अतिशय खेदजनक आहे, असे बी. एन. कुमार  म्हणाले.

त्याअनुषंगाने ‘नॅटकनेवट'ने पाणथळ क्षेत्रांच्या अधिकृती सूचीची मागणीकरत त्यांची ठिकाणे स्पष्ट करण्याची विनंती केंद्र शासनाला केली आहे, ज्यामुळे समाजाला या पाणथळ क्षेत्रांना सुरक्षित करता येईल. राष्ट्रीयपाणथळ क्षेत्र ॲटलास एखाद्या सर्वसामान्य माणसाला समजणे कठीण आहे. त्यामध्ये पाणथळ क्षेत्रांची कोणतीही विशिष्ट स्थळे नमूद केलेली नसतात.नेमक्या याच मुद्द्यामुळे आम्ही पाणथळ क्षेत्रांच्या सुयोग्य ओळखीची, सुचकता आणि सूचीची मागणी केली आहे, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले. नवी मुंबई मधील ओळख केल्या गेलेल्या पाणथळ क्षेत्रांना अधिकृत नकाशामध्ये कुठेही स्थान दिले न गेल्याची बाब अतिशय खेदजनक आहे. यामुळे साहजिकच पर्यावरणाला वाचवण्याची आमचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. पाणथळ क्षेत्रांना सार्वजनिक मालमत्ता म्हणून नेहमीच दुर्लाक्षित केले जाते, या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्री भुपेंदर यादव यांच्या उत्स्फुर्त विधानाचे पर्यावरणवाद्यांनी कौतुक केले आहे. उत्तर-पूर्व प्रादेशिक पाणथळ क्षेत्र संमेलनामध्ये यादव यांनी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन पर्यावरण यंत्रणा सुरक्षित केली पाहिजे, असे मत ॲड. प्रदीप पाटोळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अधिकृत वेबसाईट नुसार किनारपट्टीवरील पाणथळ क्षेत्रे (खारफुटी, कोरल रीपस, मडपलॅट्‌स, खाड्या) वादळी आणि भरतीच्या तीव्रतेच्या घातक परिणामांना मर्यादित करण्यासाठी भौतिक अडथळ्यांचे कार्य करतात. पर्यावरण संस्थेला सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले जात नसल्यामुळे या विधानाला काहीही महत्व राहिलेले नाही, असे ‘वनशवती समुद्री शाखा'चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबईची पाच पाणथळ क्षेत्रे तसेच भांडूप येथील सॅटेलाईट पाणथळ क्षेत्राचा भाग असलेल्या पाणथळ स्थळाला ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्य (टीसीएफएस) रामसर स्थळासाठी नियोजित करण्यात आले आहे. उच्च भरतीच्या वेळी जेव्हा पाण्याची पातळी वर जाते तेव्हा पक्षी या पाणथळ क्षेत्रांचा मार्ग धरतात, असे ‘मॅनग्रुव्ह फाऊंडेशन'ने प्रकाशित केलेल्या एटीसीएफएस व्यवस्थापन नियोजन २०२०-२०३०मध्ये ‘बीएनएचएस'ने नमूद केले आहे. तरी देखील ‘सिडको'ने कांदळवन आणि पाणथळ क्षेत्र कक्षाच्या कल्पनेला नाकारल्यानंतर पर्यावरण संस्थेला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही, हीच मोठी खंत आहे. - बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

वनशक्ती एनजीओच्या समुद्री शाखेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सिडको आणि जेएनपीए सारखे विविध प्रकल्प प्रास्तावित पाणथळ क्षेत्राचे अस्तित्व नाकारत आहेत. खुद्द एमओइएफसीसी मध्ये देखील सदर स्थळे सूचित केलेली नसल्याच्या मुद्द्याचा ते फायदा उचलू शकतात. वास्तवामध्ये उरण येथील बेलपाडा, भेंडखळ, पाणजे तसेच नेरुळ मधील एनआरआय आणि टीएस चाणक्य येथील क्षेत्र विकसनशील भूखंडाचे भाग असल्याचा दावा करत ‘सिडको'ने कांदळवन आणि पाणथळ क्षेत्र कक्षाच्या या भागांचे जतन करण्याच्या सूचनेला फेटाळलेहोते. - नंदकुमार पवार, अध्यक्ष-वनशवती समुद्री शाखा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बॅनरबाजीमुळे स्वच्छ भारत अभियानात बाधा